चिमूरमध्ये प्रथमच अखिल भारतिय आंबेडकरवादी साहीत्य सम्मेलन

चिमूरमध्ये प्रथमच अखिल भारतिय आंबेडकरवादी साहीत्य सम्मेलन

चिमूर क्रांतीभूमी फुलनार साहित्य क्रांतीने

क्रांतीभूमीत साहीत्यीकांची मांदियाळी

चिमूर (प्रतिनीधी)

         साहीत्य क्षेत्रात कार्यरत जागतिक आंबेडकरवादी साहीत्य महामंडळ नागपूर यांचे वतीने प्रथमच ग्रामीण भागातील चिमूर क्रांतीभूमीमध्ये अखील भारतिय  साहित्य सम्मेलनाचे आयोजन चिमूर येथील शेतकरी भवण सभागृहात १७ व १८ मार्चला करण्याचे ठरविले. या संम्मेलनासाठी नांदेड , मलकापुर, भुसावळ , नागपूर व चिमूर येथुन प्रस्ताव पाठविण्यात आले . मात्र मोठया शहराची निवळ न करता फक्त चिमूर क्रांतीभूमीची निवड करण्यात आली. ज्या क्रांतीभूमीने स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्या क्रांतीभूमीत प्रथमच संम्मेलनाच्या माध्यमातुन साहीत्य क्रांती होनार आहे.

      राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची कर्मभूमी असलेल्या चिमूर क्रांतीभूमीत त्यांच्या क्रांती भजनातुन देशाला स्वतंत्र करन्यासाठी बंड पुकारले होते. दरम्यान देशात सर्वप्रथम चिमूर शहर स्वंतत्र झाले. मात्र या क्रांतीभूमी नगरीच्या परीसरात अनेक साहित्य क्षेत्रातील नामवंताचे वास्तव्य असुन झाडी बोली साहीत्य मंडळाच्या द्वारे कार्यरत आहेत. या सर्व परिस्थीचा अभ्यास करून चिमूर क्रांतीभूमीला प्रथमच अखील भारतिय साहित्य सम्मेलनाचा मान मिळाला आहे. त्यामुळे या क्रांतीभूमीला संम्मेलनादरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी असे नाव देन्यात येनार आहे. या साहीत्य सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष साहीत्य क्षेत्रात व न्यायाविधी क्षेत्रात कार्यरत अॅड .भुपेशकुमार पाटील राहनार असुन सम्मेलनाचे अध्यक्ष दिक्षाभुमी डॉ . बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमूख दिपककुमार खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे .

      आयोजीत कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरीता संयोजन समीतीच्या सहविचार सभेत विचार मंथन झाले त्याप्रमाणे सम्मेलनाच्या पहिल्या दिवसी कार्यक्रमाची सुरुवात संविधान व ग्रामगीतेची ग्रंथदिडीने होईल . त्यांनतर विविध विषयावर परिसंवाद , कवि सम्मेलन , कथाकथन , व मान्यवरांची प्रगट मुलाखत .पथनाटय , एकपात्री प्रयोग होणार असल्याने चिमूर क्रांतीभूमी साहीत्य क्रांतीने फुलनार आहे.या साहीत्य सम्मेलनात राज्यभरातुन १६ तर जिल्हयातील पाचशेच्यावर साहित्यीक , कवी , नाटककार , अभिनेते येणार आहेत.व बाहेरील राज्यातील खास साहित्यीक उपस्थीत राहणार असल्याने साहित्यीकांची मांदियाळी चिमूर क्रांती भुमीत राहणार असल्याची माहीती साहित्य संम्मेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड भुपेशकुमार पाटील.सम्मेलनाध्यक्ष प्रा . दिपककुमार खोब्रागडे , सह स्वागताध्यक्ष सुरेश डांगे , कवि खेमराज भोयर , धनराज गेडाम , तिलक बांबोडे , प्रकाश मेश्राम , दलित डेकाटे , सदानंद लोखंडे , किशोर अंबादे , नथ्थु वाघमारे व प्रकाश भगत यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!