नेरी येथे मेघनाथ सहा पुण्यतिथी व भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम
नेरी येथे मेघनाथ सहा पुण्यतिथी व भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली कार्यक्रम
शुभम बारसागडे (नेरी/चिमूर):
भारतीय सखोल व खगोल अभ्यासक वैद्यनिक डॉ. मेघनाथ सहा यांची पुण्यतिथी दि.१६ ला नेरी येथील बाजार चौकातील व्यासपीठावर साजरी करण्यात आली व याच कार्यक्रमात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जय संताजी युवा मंच नेरी यांनी श्री. मेघनाथ सहा यांचा पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करून, जनतेला सहा यांच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कमलाकर लोणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून धनराज मुंगले व मार्गदर्शक म्हणून डॉ अजय पिसे सर उपस्थित होते.
मेघनाथ सहा हे तेली समाजाचे खगोलशास्त्र प्रेमी वैज्ञानिक होते. फार पूर्वी त्यांनी शिक्षण घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून, देशासाठी खुप महत्त्व पूर्ण कामगिरी केली. देशाची सेवा केली. त्याच्या कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घेऊन उंच भरारी घेतली पाहिजे व देशाची सेवा केली पाहिजे. असे डॉ. अजय पिसे यांनी मार्गदर्शनात सांगितले. तसेच याप्रसंगी देशाची सेवा करताना शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राजा पिसे, धनराज मुंगले यांनी मार्गदर्शन केले. आतंकवाद आणि होणारे हल्ले यावर मार्गदर्शन करून दहशतवादी संघटना चा घोषणा देत निषेध करण्यात आला. या कार्यक्रमाला माधव पिसे, पिंटू खाटीक, संदीप पिसे, आशीष गभने, भावना पिसे, इंदिरा कामडी, शैलेश वाघे, स्वप्नील पिसे, डॉ सुनील पिसे इत्यादी मान्यवर तसेच गावकरी उपस्थित होते. कार्यक्रम ची प्रस्थावना माधव पिसे तर आभार पिंटू खाटीक यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!