दहावीच्या विद्यार्थ्यांनीची विहिरीत उडी घेऊन अात्महत्या

दहावीच्या विद्यार्थ्यांनीची विहिरीत उडी घेऊन अात्महत्या

मूल :- (अमित राऊत)

       येथिल वार्ड क्र. सात मधील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थ्यांनीने घराजवळच्या विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. ही घटना अाज  सकाळी उघडकीस अाली. मृतकाचे नाव समिक्षा शरद भोयर, वय 16 वर्ष असे अाहे. मृतक विद्यार्थ्यांनी मूल येथिल स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेत  वर्ग  दहावीचे शिक्षण घेत होती. याप्रकरणी, मूल पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात अाला अाहे. 

घरातील सर्वांचे जेवण अाटोपल्या नंतर समिक्षा ही  अभ्यास करीत होती. सर्व मंडळी रात्री झोपल्या नंतर अात्महत्याची घटना घडली अाहे. भोयर यांची मोठी  मुलगी लघुशंकेसाठी उठल्या नंतर  तिला समिक्षा दिसली नाही. दरवाजा उघडा होता. शोधाशोध घेतल्या नंतर  विहिरीत तिचे शव दिसून अाले. 

याप्रकरणी, शरद भोयर यांनी फिर्याद नोंदविली असून या प्रकरणात एका युवकासह इतर दोन युवकांवर  संशय व्यक्त केला अाहे. मोबाइल ताब्यात घेण्यात अाले असल्याने प्रकरणाची गुढता वाढली अाहे. प्रेमप्रकरणातून अात्महत्या झाली काय, याचा  पुढील तपास मूल पोलिस करीत अाहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!