वन्यप्राण्याची शिकार - तीन आरोपी अटकेत

सावली (प्रविण झोडे)

सावली तालुक्यातील मौजा राजगडचे शेतशिवारात दि. 18.02.2019 रोजी दु 1.30 वा.चे दरम्यान वन्यप्राणी रानडुक्कर व रानमांजरची कुत्र्याचे मदतीने शिकार करून दोन्ही वन्यप्राण्याचे मृत शवास अग्नीव्दारे भाजून रानडुक्कराचे अंदाजे 200 किलो मास कापून त्याच ठिकाणी शिजवत असल्याचे गोपनीय माहीतीवरून श्री उमेशसिंह झिरे, WTT व सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री जी ही धाडे यानी त्यांचे पथकासह घटनास्थळावर धाड मारून भाजलेला रानडुक्कर अंदाजे 15 किलो व रानमांजर अंदाजे-3 किलो व सदर गुन्हयात वापरण्यात आलेले कु-हाड, सब्बल, विळा इत्यादी साहीत्य जप्त करून पी. ओ. आर., मौकापंचनामा व जप्तीनामा नोंदवून घटनास्थळावरील तिनही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता चौकशीअंती सदरचा रानडुक्कर मौजा बोरचांदली येथील श्री रविंद्र खुटावार यांचे शेतात तर रानमांजर मौजा राजगड येथील श्री राज मारकवार याचे शेतात शिकार केल्याचे सिध्द झाले. सदर प्रकरणात आरोपी क. 1) साईनाथ गंगाराम मेटपल्लीवार 2) अशोक चिन्नप्पा मेटपल्लीवार 3) सोमनाथ गंगाराम मेटपल्लीवार यांना न्यायालयाने जामीण नाकारून दि. 02.03.2019 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सदर प्रकरणातील तिनही आरोपींना यापूर्वी अनेकदा वन्यप्राण्यांची शिकार केल्याचे त्याचे बयानातून स्पष्ट झाले व अजुनही काही आरोपी या गुन्हयात अडकणार असल्याची माहीती असून पुढील तपास श्री जी कही धाे वनपरिक्षेत्राधिकारी सावली यांचे मार्गदर्शनात श्री ही सी धुर्वे, वनक्षेत्र सहाय्यक सावली हे करीत आहेत.

सदर प्रकरणात श्री ही एस भोयर क्षेत्र सहाय्यक पंढरी, श्री व्ही जी चौधरी, श्री राकेश चौधरी, श्री वासेकर श्री गायकवाड वनरक्षक, श्री पंकज दुधे घोडवाही यानी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!