सिंदेवाही येथे व्यापाऱ्यांनी वाहीली श्रध्दांजली

सिंदेवाही (शशीकांत बतकमवार)

येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे व्यापारी असोसिएशन तर्फे आयोजन  !!  सिंदेवाही शहरातील व्यापारी असोशिएशन सिंदेवाही चे वतीने मंगळवार दिनांक 19 फेब्रुवारीला 2019 ला गांधी चौक येथे संद्याकाळी आयोजित करण्यात आली होती ... 14 फेब्रुवारी ला काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात शाहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली ! कार्यक्रम प्रसंगी भारताच्या सीमेवर  लढणारे जम्मू येथील जवान सिंदेवाही तालुक्यातील  श्री जुमनाके , सिंदेवाही चे माजी जवान श्री सडमाके , श्री पंचलवारजी यांची कार्यक्रम स्थळी प्रामुख्याने उपस्तिती लाभली होती.. सिंदेवाही शहरातील सर्व बाजारपेठ, व्यापारी वर्गाचे सर्व दुकान, प्रतिष्ठान बंद होती . शहीद झालेल्या वीर जवाना साठी सायंकाळी 7 वाजता कँडल मार्च शहरातील प्रमुख मार्गाने  गांधी चौक पासून शिवाजी चौक ,सिद्धार्थ चौक,  राम मंदिर  , बाजार चौक पर्यंत  रॅली काढण्यात आली .. भारत माता कि जय, वंदेमातरम चे नारे,  प्रत्येक  हातामध्ये तिरंगा आणि  एक मेणबत्ती घेऊन 

लहान बालगोपाल , युवक, शहरातील महिला , नागरिक, व्यापारी मित्र, जेष्ठ मंडळी, प्रतिष्टीत नागरिक सहभागी झाले आणि कार्यक्रम स्थळी सिंदेवाही शहरातील सर्वांचा सहभाग भरपूर प्रमाणात होता ,श्रद्धांजली कार्यक्रम ची  शेवटची सांगता राष्ट्रगीत ने करण्यात आली....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!