अस्वलीच्या हल्यात दोन जखमी
चंद्रपूर (वार्ताहर)
मामला जवळ चोरगाव येथे सकाळी शेतावर काम करीत असताना दोघांवर अचानक अस्वलीने हल्ला चढविला या घटनेत दोन मजूर जखमी झाले. वन्यप्राणी व मानव संघर्ष सध्या जिल्ह्यात सुरू आहे, वर्षभरात या घटना वाढतच आहे, वन्यप्राण्यांच्या हद्दीत मानव जाऊ लागला याच कारणाने हे हल्ले वाढत आहे, चोरगाव येथे जंगलाजवळ शेतात काम करायला गेलेले परशुराम कवडू कन्नाके, राजेंद्र गोविंद मरस्कोले यांच्यावर अचानक अस्वलीने हल्ला चढविला कसाबसा प्रतिकार करीत दोघे हल्ल्यात वाचले, हल्ला झाल्यावर लगेच दोघांनी आरडाओरड केली यांचा आवाज ऐकून गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली, तात्काळ दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!