चिचाळा प.स. क्षेत्रातील विजेची समस्या निकाली
चिचाळा प.स. क्षेत्रातील विजेची समस्या निकाली.
सभापती डोहणे यांच्या पाठपुराव्याला यश
दोन दिवसात काम सुरु
मूल (अमीत राऊत)
मूल तालुक्यातील चिचाळा पंचायत समिती क्षेत्राचे प्रतिनिधित्व पं.स. च्या विध्यमान सभापती पुजाताई डोहणे या करित आहेत. या भागात सातत्याने महावितरणच्या दुर्लक्षितपणामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असुन चिचाळा परिसरातील गावांध्ये वाढिव विद्युत खांबाची गरज असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत.
मात्र नागरिकांच्या या समस्येची दखल पुजाताई डोहणे यांनी घेतली असुन महावितरणकडे पाठपुरावा केला. दोन दिवसाआधी महावितरणच्या अधिकार्याना सोबत घेऊन गावांची पाहणी केली.
महावितरणने चिचाळा परिसरातील गावासाठी दोन डि.पी. व वाढिव पोल मंजुर केले असुन आजपासुन प्रत्यक्षात काम सुरु केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.
चिचाळा प.स. क्षेत्रातील प्रत्यरक गावात सभापती डोहणे यांनी भेट देत असुन समस्या जाणुन घेत त्यांचे निराकरण करित असल्याने चिचाळा प.स. क्षेत्रात विद्युत समस्या निकाली निघण्याच्या मार्गावर आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!