धनोजे कुनबी महिला आघाडी तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
धनोजे कुनबी महिला आघाडी तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
वरोरा - प्रतिनिधी
आलेख रट्टे
वरोरा : - दिनांक.२८/०२/२०१९ धनोजे कुनबी महिला आघाडी तर्फे वरोरा तालुका धनोजे कुनबी समाज वरोरा अंतर्गत धनोजे कुनबी समाजभवन वरोरा येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला वरोरा तालुका धनोजे कुणबी समाज वरोरा या संस्थेचे उपाध्यक्ष श्री रमेश राजूरकर साहेब हे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री संजय बोढे, सचिव श्री मदनराव ठेंगणे, सह सचिव श्री संतोष राव बोबडे, सौ प्रतिभाताई धानोरकर, सल्लागार ऍड.बबनराव बोथले, कोषाध्यक्ष संभाजी गारघाटे , महिला सदस्य सौ. रेखाताई बोढे, सौ.कविता गोवरदिपे, व महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ.तेजस्विनी पावडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी १४ फेब्रुवारी ला काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्लयात शहीद झालेल्या जवानांना आणि वरोऱ्याचे स्वर तपस्वी विश्वनाथजी मत्ते सर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रमची सुरुवात तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे या प्रेरणा गीताने झाली. विविध रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आले.यात मनोरंजना सोबतच सामाजिक संदेशही देण्यात आला. यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, मुलींवर होणारे अत्याचार, मोबाईल चे वेड, यासारखे प्रश्न मांडण्यात आले. कार्यक्रम ला खरी रंगत आणली ती फॅशन शो ने. यात भारतातील विविध राज्याची वेशभूषा परिधान करण्यात आली होती. यातून विविधतेतून एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला. सोबतच कोळी नृत्य, पंजाबी नृत्य, गुजराती नृत्य, लावणी असे एकापेक्षा एक सुंदर असे नृत्य प्रकार सादर करण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन सौ.स्मिता सोनेकर,सौ.मायाताई राजूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्मिता देवाळकर, माधुरी बोंडे, उज्वला धवस,लीना राजूरकर,मनीषा कुरेकर, गिता पोफळे,योगिता हेपट,संगीता घुगल,अर्चना बोबडे,सपना टेमुर्दे,विभा आगलावे,निता बोधे ,शुभांगी बोथले,संगीता घुगल यांचे सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!