मूल शहरात शिवजन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न
मूल शहरात शिवजन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न
मूल :- (अमित राऊत)
शिवशाही युवक मित्र मंडळ तर्फे मूल शहरात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
शिवजयंतीनिमित्याने सोमनाथ प्रकल्पातील कुष्ठरोगी रूग्णांना भेट, उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना , मूकबधीर शाळा व इंदिरा गांधी प्राथमिक शाळेत फळ वाटप, गांधी चौक परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अशाप्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
18 फेब्रुवारीला कन्नमवार सभागृहात व्याख्यानमाला आयोजिक करण्यात आली होती. या व्याख्यानमालेकरीता नैतिक प्रशासन व्यवस्था आणि वर्तमान राजकारण या विषयावर शिवश्री कपिल ढोके तर स्पर्धा परीक्षा यावर 111 यांनी मार्गदशन केले. यावेळी आजी—माजी सैनिकांचा पाहुण्यांच्या व शिवशाही युवक मित्र मंडळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
19 फेब्रुवारीला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ही शोभायात्रेला कृषी उत्पन्न बाजार समिती पासून सुरूवात करण्यात आली. मुख्य मार्गाने जात गांधी चौक ते तहसिल कार्यालय परत गांधी चौक येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत युवकांनी हाती भगवा झेेडा घेत मराठी पेहरावात फेटे बांधून ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणाने परीसर शिवमय झालेला होता. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा यशस्वी करीता शिवशाही युवक मित्र मंडळचे अध्यक्ष किसन शेरकी व मंडळाच्या सर्व पदाधिकारी , सदस्यांनी मेहनत घेतली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!