उमा नदीकाठावरील शेतकऱ्यांवर पथ फाइंडर कन्स्ट्रक्शन कंपनीची मनमानी

उमा नदीकाठावरील शेतकऱ्यांवर पथ फाइंडर कन्स्ट्रक्शन कंपनीची मनमानी


चिमूर - प्रतिनिधी

    विलास मोहिनकर


चिमूर : - दिनांक.२१/०२/२०१९ सध्या उमरेड-चिमूर-देवळी या महामार्गावर रोडच्या रुंदीकरणांचे काम सुरू असून चिमूर येथील बायपास रस्त्याने रोडच्या रुंदीकरणांचे काम सुरू आहे, मात्र रोडलगत असलेल्या कास्तकारांना याची तिळमात्र हि सूचना नसून पथ फाईंडर कंपनि च्या कंत्राटदाराने मुजोरीने रोडचे खोदकाम सुरू केले, हि माहिती काही कास्तकारांना मिळताच कामावर धडकले व काम बंद करून होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईची मागणी केली, अन्यथा पोलिसात तक्रार देणार असल्याची माहिती काही शेतकऱ्यांकडून मिळाली. सध्या सगळीकडे तालुक्यात तसेच जिल्ह्यात महामार्ग रुंदीकरणांचे काम चालू असून चिमूर येथून पेठ मोहल्यातून बायपासने मासळ-देवळी कडे जाणाऱ्या मार्गाचे रुंदीकरनाचे काम पथ फाईंडर कन्स्ट्रक्शन कंपनी जबलपूर या कंपनीला दिले असून उमा नदी काठावरील शेतकऱ्यांच्या जागेतून माती तसेच मुरूम उत्खनन करून रोड रुंदीकरणांचे काम सुरू आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हरभरा, गहू व इतर भाजीपाल्याचे उदपादन असून साईडिंगचे कुंपण काढून उत्खनन सुरू आहे, मात्र याची पूर्व सूचना कोणत्याही शेतकऱ्याला मिळाली नाही, काही शेतकऱ्यांना माहिती मिळताच शेतकरी कामावर धडकले व काम बंद करून नुकसानभरपाई ची व रुंदीकरणासाठी गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यात यावा अशी मागणी केली अन्यथा पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदिप बंडे यांच्या सहित आदि शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!