तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगुल विवाह बंधनात
तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगुल विवाह बंधनात
पळसगाव - प्रतिनिधी
विकास खोब्रागडे
पळसगाव : - दिनांक.२१/०२/२०१९ चिमूर येथूनच जवळ असलेल्या पिपरडा तालुका चिमूर येथे तंटामुक्त समितीच्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वजातीय प्रेमीयुगुल विवाह बंधनात अडकले. पिपरडा येथील प्रशांत रामदास खोब्रागडे वय २५ वर्ष या मुलाचे प्रेमसंबध वैरागड ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील दिक्षा उद्धव भैसारे वय १९ वर्ष या मुलीसोबत गेल्या काही दिवसापासून प्रेम संबंध होते. त्यामुळे या प्रेमीयुगलाने लग्न करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी तंटा मुक्त समिती पिपरडा येथील तंटामु्नत समिती अध्यक्ष रूपचंद बारसागडे व समिती यांच्याकडे लग्न लावून देण्यास विनंती अर्ज सादर करुन कागदपत्र सादर केले त्यानुसार दोघेही लग्नायोग्य असून वयाने पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांचे लग्न ग्रामपंचायत कार्यालय पिपरडा येथे सायकाळी ०८:२० वाजता गावकऱ्यांच्या उपस्थितीत हरिबाजी चुनारकर यांनी बौद्ध धर्माच्या रितिरिवाजानुसार लग्न लावण्यात आले. यावेळी गावकयांनी नविन जोडप्याला भरभरून आशिर्वाद दिला. यावेळी रूपंचंद बारसागडे तंटा मुक्त समिती अद्यक्ष,भिमराव चुनारकर पोलिस पाटील,डॉ.सहारे,सरपंच मॅडम, उद्धव खोब्रागडे ,वृक्षमला शेंडे,भगवान कावळे,व आदि गावकरी यावेळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!