शिवसाम्राज्य प्रतिष्ठान चिमूर यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न
चिमूर - प्रतिनिधी
विलास मोहिनकर
चिमूर : - दिनांक.१८/०२/२०१९ रोज सोमवरला शिवसाम्राज्य प्रतिष्ठान चिमूर यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमास प्रबोधन सत्रापासून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून चिमूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक प्रमोद मडामे , पि. एस.आय.गणेश इंगोले , अध्यक्ष म्हणून उप विभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे , मुख्य मार्गदर्शक म्हणून बहुजन विचारवंत राजाभाऊ झोडे , प्रमुख वक्ते म्हणून प्रा.विजय फुकट सर व डॉ.संजय बोढे सर , विशेष अतिथी म्हणून तहसिलदार चिमुर नागटिळक , नगर परिषद चिमूर मुख्याधिकारी मनोजकुमार शहा , उप जिल्हा रुग्णालय चिमूर चे वैधकिय अधिक्षक डॉ.गो.वा. भगत , डॉ.अश्विन अगडे , डॉ.सचिन बोरकर , डॉ.प्रशांत मेश्राम , डॉ.महेश खानेकर , सत्कार मूर्ती म्हणून लाभलेले तूर उत्पादक शेतकरी निलेश राठोड , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रुग्णसेवा पुरस्कार (रक्तदान) श्रेयश लाखे , जिवन गौरव पुरस्कार (पर्यावरण) कवडु लोहकरे , गौरक्षण गोंदेडा (संरक्षक) कमल असावा , मुख्याध्यापक न्यू राष्ट्रिय विधालय चिमूर ( वृक्ष सांगोपण व संवर्धन ) या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवना विषयी आप-आपली थोडक्यात विचार जनते समोर व्यक्त केले. मूक - बधिर विधालय वडाळा पैकु चिमूर येथिल विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप , चिमूर नगर परिषद च्या सफाई कामगारांचा सत्कार अशा प्रकारे प्रबोधन सत्र कार्यक्रम संपन्न झाला.
जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषानी दुमदुमली चिमुर नगरी
- शिव साम्राज्य प्रतिष्ठान तर्फे शिवजयंतीचे आयोजन
चिमुर येथे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान च्या वतीने १९ फ्रेब्रुवारी रोजी जानता राजा व हिन्दवी स्वराज्याचे स्वंस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती धुंमधडाक्यात साजरी करण्यात आली, शिवजयंती निमित्य भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभयात्रेमुळे चिमुर क्रांति नगरीत जय शिवाजी जय भवानी च्या जय घोषानी शिवकालीन वातावरण निर्माण करण्यात आले. घोड्यावर बसविलेले शिवाजी महाराज उपस्थितांचे लक्ष वेधुन घेत होते, छत्रपति शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ति, रंगिबिरंगी विद्युत रोशनाई, भजन, दिंडी, पालख्या, डि.जे. व धुमाल च्या संगीतावर बेधुन्द होउन्न युवक युवती थिरकतांना दिसली यामुळे चिमूर शहरामधे शिवकालीन वातावरण निर्माण झाले.
चिमुर नगरित निघालेली शोभायात्रा सामाजिक एकतेचे प्रतीक ठरले असून सर्व धर्मीय समाज बांधव शोभयात्रे मधे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शुभम सातपुते, प्र्रस्तविक श्रद्धा डोईजड व् आभार हरि कामडी यानि मानले, कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी बालू हेल्वतकर, सागर इलकर, विष्णु अगड़े, रितेश चौरे, निखिल डोईजड, वैभव लांडगे, प्रशांत गायकी, स्वप्निल सावसाकड़े, दिपक पुंड, तेजस मिसार, यानी परिश्रम केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!