वनविभाग कार्यालयाची नागरिकांनी केली तोडफोड वनकर्मचारी यांच्यावर केला प्राणघातक हल्ला चिमूर येथील ठाणेदार प्रमोद मडामे आपल्या पोलिस ताफ्यासह घटनास्थळावर दाखल
वनविभाग कार्यालयाची नागरिकांनी केली तोडफोड
वनकर्मचारी यांच्यावर केला प्राणघातक हल्ला
चिमूर येथील ठाणेदार प्रमोद मडामे आपल्या पोलिस ताफ्यासह घटनास्थळावर दाखल
पळसगाव - प्रतिनिधी
विकास खोब्रागडे
पळसगाव : - पळसगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाची नागरिकांनी केली तोडफोड व वनविभागाच्या कर्मचारी यांच्या वर नागरिकांनी केला प्राणघातक हल्ला दिनांक २४/०२/२०१९ ला मौजा पळसगांव येथील कक्ष क्रंमाक. नियत क्षेत्र १ मध्ये २२४ येथे पिपर्दा येथील ८ महिला जंगलात दिसल्या असताना चंद्रपूर येथील डि.एफ.ओ. गुरुप्रसाद यांनी नियत क्षेत्र १ मध्ये पकडले आरोपींना समोरील कार्यवाही करण्याकरीता आरोपींना पळसगावं येथील वनकार्यलयात आणले असता पुढील कार्यवाही करीत असताना पिपर्डारोड कढून जमाव एकदम चालून आला आणि नागरिकांना ही बातमी कळली असता नागरिकांचा जमाव चालून आला कुठलेही विचारपूरस न करता एकदम वनविभाची गेटला लाथा मारून गेटची तोडफोड केली.वनविभागाच्या दिसेल त्या वस्तूची तोडफोड केली.आरोपीने बळजबरीने वनकार्यलयात आणल्या मुळे नागरिकांनी ग्रामस्तानी पळसगावं येथील वनपरिक्षेत्र कार्यालवर हल्ला करून फिरते पथक यांच्या कर्मचारी तंबूडगे,नेवारे, सोनेकर , कसार , आभारे यांच्यावर सुद्धा हला करून त्यांना जखमी करण्यात आले. त्याना पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णलाय चिमूर येथे वैद्यकीय उपचाराकरिता रवाना करण्यात आले असून वनविभाग फिरते व्याघ कृती दल यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या वनविभागाच्या ३ वाहनावर जमावाने हल्ला करून तोडफोड केली,परिसरातील वनविभागच्या त्रासामुळे लोकचा जमाव चालून आला कि काय हे मात्र कळायला मार्ग नाही,सदर प्रकार घडला त्या वेळेस वनमहिला कर्मचारीसुद्धा उपस्थित होत्या सदर प्रकारामुळे वनविभाची लाखो रुपयांची नुकसान झाली. असून सदर कृत करण्यर्यांना कठोरात कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.भागवत , कुलकर्नि वनअधिकारी चंद्रपूर, जाधव मॅडम,मुरकुटे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी पळसगांव ,ठाणेदार प्रमोद मडामे यांच्या सह वनकर्मचारी पोलीस रात्रौ ०३:०० वाजेपर्यंत आरोपींना धरपकड मोहीम चालू केली असून वृत्त लिहे पर्यंत कारवाही चालू होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!