मजुरांना तात्काळ कामे द्या - सावलीत आमदार विजय वडेट्टीवार यांचे आढावा सभेत सूचना

मजुरांना तात्काळ कामे द्या - सावलीत आमदार विजय वडेट्टीवार यांचे आढावा सभेत सूचना

सावली (प्रविण झोडे)

 तहसील कार्यालयात विविध विषयांवर आमदार विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली आढावा सभा घेण्यात आली या सभेत प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

          सावली तालुक्यातील तहसील विभाग, पंचायत समिती, महसूल विभाग, कृषी विभाग, सिंचाई विभाग, बांधकाम, पाठबंधारे, सर्वजनिक बांधकाम, वीज वितरण, वनविभाग, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, ग्रामसेवक, तलाठी, गोसिखुर्द, असोलमेंढा प्रकल्प, बँक अधिकारी  इत्यादि विभागाचा आढावा घेतला. 

यावेळी मजुरांना कामे तात्काळ उपलब्ध करून द्या, वन्यप्राण्यांमुळे शेत पिकाच्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्या, कृषी पम्प व घरगूती वीज मीटरची कामे पूर्ण करा, धान्याचा दर्जा तपासणी करूनच वाटप करा व इतरही विभागाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. आढावा सभेत तहसीलदार उषा चौधरी, संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले,  पंचायत समिती गटनेते विजय कोरेवार, सहाय्यक वनसंरक्षक श्रीनिवास लखमावार, उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहूर्ले, भास्कर पा गडमवार उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!