शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

मुल (प्रकाश चलाख)

 तालुक्यातील हळदी येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .या दिनाचे औचित्य साधून अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम तसेच महिलांसाठी निबंध /रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

 शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त हळदी येथे महिलांसाठी निबंध/ रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात गावातील महिला मंडळींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यानंतर शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाअगोदर पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय हळदी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हळदीचे मुख्याध्यापक श्री शेरकी सर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून समाजाला जागृत होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमापूर्वी गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी" शिवाजी महाराज की जय "च्या जय घोषाने परिसरात चैतन्य निर्माण  झाले होते.गावात बऱ्याच वर्षानंतर शिवाजी महाराजांची जयंती व मिरवणूक निघाल्याने गावातील सर्व जनतेने सोमनाथ कोल्हे ग्राम परीवर्तक यांचे विशेष आभार मानले.

 कार्यक्रम समारोपापूर्वी निबंध/रांगोळी स्पर्धेत पात्र ठरलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच सौ कमल बुरांडे ,प्रमोद चलाख उपसरपंच, रमेश चलाख केंद्रप्रमुख ,श्री शेर की सर मुख्याध्यापक हळदी, दशर थ पिंपळे ,भास्कर गावतुरे शा स अध्यक्ष, जीवन चलाख सा .कार्य.  सोमनाथ कोल्हे  ग्रामपरिवर्तक हळदी आदी मान्यवर उपस्थित होते

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाविक कारडे, लेनगुरे, विनोद गावतुर मंगेश भुरसे आदींनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!