काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी - सुभाष धोटे
काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी
- सुभाष धोटे
वरोरा - प्रतिनिधी
अमोल सेलकर
वरोरा : - वरोरा दिनांक.२०/०२/२०१९ भारतीय जनता पार्टीने आपल्या जाहीरनाम्यात मोठ - मोठे आश्वासन दिले होते .पण ती आश्वासने फोल ठरली . शेतकऱ्यांना कर्जमाफी,जनधन योजनेत प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये , बेरोजगारांना रोजगार असे कितीतरी आश्वासन प्रत्यक्षात उतरले नाही.बीजेपी च्या कार्यकाळात शेतकरी, बेरोजगार , व्यापारी त्यांचा अपेक्षाभंग झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकार येताच उत्तराखंड, मध्य प्रदेश , राजस्थान मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. देशात काँग्रेसची सत्ता आली तर शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी दिली जाईल अशी माहिती काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांनी दिली. वरोरा येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत मध्ये ते बोलत होते. केंद्रीय सरकार ने आपल्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी ६००० रुपये देण्याची योजना आखली हा शेतकऱ्यांचा अपमान आहे.काँग्रेसने आपल्या कार्यकाळात संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गरीब, विधवा ,निराधार यांना सहाशे रुपये प्रतिमहिना मानधन देऊ केले होते .भाजपाचे शेतकऱ्यांसाठी वार्षिक सहा हजार रुपये ही शेतकर्याची थट्टा आहे . राज्य सरकारची शेतकरी सन्मान योजना संपूर्णपणे फसवी ठरली आहे.ते पुढे म्हणाले की सांसद हंसराज अहिर यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात रेल्वेच्या थांबा शिवाय विशेष काहीच झाले नाही. त्यांनी जिल्ह्यासाठी कोणतेही उल्लेखनीय कार्य केले नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राकडून ७० टक्के राशी उपलब्ध होते . परंतु याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मिळालेला नाही. अहीर यांच्या कार्यशैलीने जिल्ह्यातील मतदारांचा मोहभंग झालेला आहे. नुकत्याच झालेल्या भाजप-शिवसेना युती बद्दल बोलताना ते म्हणाले की ही युती संधीसाधू आहे. प्रियंका गांधी च्या आगमनाने बीजेपी धास्तावून आहे यामुळेच बिजेपीला शिवसेनेची युती करणे भाग पडले असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील काँग्रेस मध्ये असलेल्या गटबाजी बद्दल बोलताना मतभेद हे कोणत्याही पक्षात असतात ते दूर करण्यात येईल.पक्षात जो कार्यकर्ता काम करणार नाही तो प्रवाहाच्या बाहेर फेकल्या जाईल, लोकसभेच्या उमेदवारी बद्दल बोलताना त्यांनी पक्षचा आदेश मला मान्य राहिल. माझ्याशिवाय कोणताही उमेदवार लोकसभे साठी निवडणूक लढवत असेल तर आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी राहू . यावेळी पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या सोबत डॉ. विजय देवतळे , डॉ.आसावरी देवतळे,शिल्पाताई बोडखे ,नंदाताई अल्लूरवार, चित्राताई डांगे ,विलास टिपले, मिलिंद भोयर, मनीष जैस्वाल, गिरीधर कष्टी, सोमदेव कोहाड, सलीम पटेल , गुणवंत भोयर विनोद लांबट , राजू जाजूर्ल, अमोल सेलकर आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!