सावली बसस्थानकाचे भूमिपूजन आमदार वडेट्टीवार यांचे हस्ते संपन्न
सावली चंद्रपूर -प्रविण झोडे
सावली - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सावली शहरातील बसस्थानकाचा प्रश्न निकाली काढून नवीन बांधकाम मंजूर करण्याच्या प्रयत्नाला आमदार वडेट्टीवार याना यश आले. या नवीन बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार विजय वडेट्टीवार उपगटनेते विधिमंडळ तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांचे हस्ते पार पडले. तसेच गुरुदेव सेवा मंडळ करीता सामजिक सभागृह चे बांधकाम करण्याकरीता स्थानिक विकास निधी अंतर्गत 7 लक्ष मंजुर करुन त्याच दिवशी भूमिपूजन करण्यात आले .
सावली हा तालुक्याचा ठिकाण असूनही बसस्थानक नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. या भागात आमदार वडेट्टीवार यांचेकडे नेतृत्व आल्यानंतर अनेक विकासाची कामे केली. नवीन बसस्थानक 2 कोटी64 लाख किंमतीचे असून यात 6 फलाट, आरक्षण कक्ष, हिरकणी कक्ष, आरक्षण केंद्र,स्टॉल बार, पार्सल, प्रसाधन गृह अशा सुविधा आहेत. भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास यासलवार नगराध्यक्ष नगरपंचायत सावली, जिल्हा परिषद सदस्य वैशाली शेरकी, दिनेश पा. चिटनुरवार, पंचायत समिती गटनेते विजय कोरेवार, तालुका अध्यक्ष यशवन्त बोरकुटे, उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहूर्ले, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, प्रकाश पा राईचवार, राकेश गडमवार, राजेश सिद्दम, नगरसेविका रजनीताई भडके, छत्रपती गेडाम, शिलाताई शिंदे, योगिता बुगदलवार, सेवेन्द्र मडावी, विनोद वाळके, मनीषा जवादे, संगीता चौधरी, शिलाताई मशाखेत्री आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कोरेवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत गेडाम यांनी तर आभार युवक तालुका अध्यक्ष नितीन दुवावार यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!