स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे समुपदेशन कार्यक्रम

स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे समुपदेशन कार्यक्रम 

मूल येथे शालेय विद्याथ्र्यांना समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन

मूल (अमित राऊत)

      मूल शहरातीलच दहाव्या वर्गात शिक्षण घेत असणारी विद्यार्थीनी समिक्षा भोयर हिने नुकतेच तीन दिवसाआधी दिनांक 18 फेबुवारीला आत्महत्या केल्याने क्षेक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली होती. त्या निमित्याने शहरातील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेत विद्याथ्र्यांना समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या संस्थापिका तथा अध्यक्षा माजी मंत्री शोभाताई फडणविस ह्या होत्या, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मूर्लीधर कासार, प्रमुख पाहुणे मोतीलाल टहलीयानी, देवराजभाई पटेल, मुख्याध्यापक नितीन घरोटे आदी पाहुणे उपस्थित होते. 

   मार्गदशन करतांना मोबाईल हा मित्र आहे, तो वापरायचा कसा ते आपल्यावर अवलंबून आहे. अल्पवयात मुलींनी भावनेच्या आहारी न जाता आपल्या जन्माचे सार्थक कशात आहे हे समजणे महत्वाचे आहे. आपल्यामुळे आई वडिलांच्या डोळृयात अश्रू आलेत तर ते आनंदाश्रूच आले पाहिजे. असे मार्गदर्शन शोभाताई फडणवीस यांनी केले.  

    विद्यार्थाने शिक्षण घेतल्यानंतर सुजान नागरीक व्हावा, याकरीता कर्तव्याची आठवण राहावी म्हणून शाळेच्या अध्यक्षा शोभाताई फडणवीस व पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थाना वचनधागा बांधण्यात आला. 

    आम्ही भारताचे देशभक्त प्रामाणिक नागरीक होवू, आमच्या हातून कधीही गैरकृत्य घडणार नाही, कुटूंबाचे, देशाचे आणि समाजाचे हीत राखण्याची विद्यार्थानी शपथ घेतली. 

     यावेळी पोलीस निरीक्ष कासार यांनी जगातील सुंदर मित्र कुआपले आई वडिल आहेत त्याच्याशीच चर्चा करा. रस्त्याने जातांना मुलींना कोणी छेडछाड करीत असेल, मोबाईल वर कोणी वारंवार त्रास देत असेल तर पोलीसांना कळवा, पोलीस दल चोवीस तास जनतेच्या सेवेत मदतीला येतील. 

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नितीन घरोटे यांनी केले, संचालन आकाश संगेल, तर आभार गुरूनुले यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!