सिंदेवाही तालुक्यातील इसमाची गळफास लावून आत्महत्या

सिंदेवाही तालुक्यातील इसमाची  गळफास लावून आत्महत्या

सिंदेवाही :-   सिंदेवाही तालुक्‍यातील  मोहाडी (नलेश्वर) येथे राहणाऱ्या  गावातील एका इसमाने छताला टॉवेल बांधून गळफास घेतले.

सविस्तर वृत्त असे की, मृतक दिनकर शंकर गेडाम वय ४५ वर्ष रा. मोहाडी (नलेश्वर) यांचे पत्नी व मुलगा गावात च नाटक बघायला गेले असता .पहाटे सकाळी ४ वाजता  आल्यावर बघितले की , घराचा आत मधून दरवाजाची कडी लावली आहे. घराच्या आत मध्ये बघितले असता छताला टॉवेल बांधून गळफास  लावला दिसला . त्याचे नाव मृतक दिनकर शंकर गेडाम   असे आहे.

अशी माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतकाचे शव ताब्यात घेतले. व मृतकाचा कुटुंबीयांना विचारणा केली असता. मृतकाला पोट दुखण्याचा असाह्य वेदना होत होते. त्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असावे , असे  सांगितले. यावरून सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस यशवंत  ठोंबरे यांनी अप .क्र. ४ नुसार मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!