जि.प.गट नेते डॉ.सतिश वारजूकर यांनी अपघात ग्रस्ताला दिला आधार
जि.प.गट नेते डॉ.सतिश वारजूकर यांनी अपघात ग्रस्ताला दिला आधार
चिमूर - प्रतिनिधी
विलास मोहिनकर
चिमूर : - दिनांक.२५/०२/२०१९
चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील जांभूळघाट लगत असलेल्या मांगलगांव येथील रहिवाशी अरविंदजी दसरथ घानोळे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला त्या अपघातात ते खूप गंभीर जखमी झाले.त्यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले त्यामुळे त्यांना चालणेही होत नव्हते त्यांनी आपली समस्या आपले चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते तथा गट नेते जि.प.चंद्रपूर सतिश वारजूकर यांना सांगितले कारण सतिशभाऊ राजकारणासोबत ते समाज कार्यात जास्त भर देत असतात नेहमी जनसामान्यांच्या मदतीला धावत असतात त्यांचे कडे कुणीही आले तरी निराश होहुन कुणीही परत जात नसतात नुसते चिमूर विधानसभा क्षेत्रात नव्हे तर चंद्रपूर जिल्हा मध्ये ते समाज कार्य करत असतात अशातच त्यांनी मांगलगाव येथील घानोळे यांना स्वनिधीतू व्हील चेअर देऊन आधार दिला त्यावेळी पं.स.गट नेता तथा चिमूर विधानसभा युवक कांग्रेस उपाध्यक्ष रोषण ढोक ,पं.स.सदस्य भावनाताई बावनकर ,ग्रा.पं. सदस्य दिलिप पांचभाई,एकनाथ आष्टनकर यावेळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!