सागर खोब्रागडे यांच्या प्रयत्नाने अपंगाला मिळाला आधार
सागर खोब्रागडे यांच्या प्रयत्नाने अपंगाला मिळाला आधार
नवरगांव (अमोल निनावे)
चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील जांभूळघाट लगत असलेल्या मांगलगांव येथील रहिवाशी अरविंद दसरथ घानोळे यांच्या काही दिवसांपूर्वी अपघात झाला त्या अपघातात तो खूप गंभीर जखमी झाला,त्यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले त्यामुळे त्यांना चालणेही होत नव्हते त्यांनी आपली समस्या नागभिड तालुक्यातील गिरगाव येथील सोशल मिडिया प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते .सागर खोब्रागडे यांना सांगितले व सदर समस्येचे निराकरण लवकरात लवकर करावे अशी मागणी केली. सागर खोब्रागडे यांनी त्यांची समस्या गंभीर घेत त्यांनी लगेच चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते तथा गट नेता जि. प.चंद्रपूर सतिश वारजूकर यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून घानोळे यांची संपूर्ण परिस्थिती डॉ.सतीश यांना सांगितली व घानोळे यांना तात्काळ व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.सतीश वार्जुरकरने ने त्यांच्या मागणीला लगेच होकार दिला व आज दि.२५/०२/२०१९ ला डॉ.सतीश वारजूकर यांनी घानोळे यांच्या घरी जाऊन स्वनिधीतून व्हील चेअर देऊन खूप मोठा आधार दिला.यावेळी घानोळे परिवार यांनी डॉ.सतीश वारजूकर व सागर खोब्रागडे यांचे आभार मानले. त्यावेळी पं. स.गट नेता तथा चिमूर विधानसभा युवक कांग्रेस उपाध्यक्ष रोषणभाऊ ढोक,पं. स.सदस्य भावनाताई बावनकर,ग्रा.पं. सदस्य दिलिप पांचभाई,एकनाथ आष्टनकर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!