चौकशीचा सैराट,अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : प्रशांत कोल्हे
चौकशीचा सैराट,अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : प्रशांत कोल्हे
चौकशी च्या फार्स मध्ये अडकली 2016 -17ची देयके
मनरेंगाचे पुरवठादार देयका पासून वंचित
पत्रकार परिषदेतुन मनसेचा आंदोलनाचा इशारा,
शुभम बारसागडे (नेरी/चिमूर):
चिमूर पंचायत समिती अंतर्गत सन 2016- 17 मधे रीतसार ग्रामसभेतुन करावयाच्या कामाचा कृती आराखडा तयार करून पस ला पाठविण्यात आला त्यावर पंचायत समितीने प्रशासकीय मान्यता देऊन काम करण्यात आले मात्र कामात अनियमितता झाल्याच्या कारनावावरून सदर कामातील सर्वच ग्रामपंचायत मधिल पुरवठादाराचे देयके चौकशी च्या फार्स मध्ये अडकली आहेत तर दोन वरश्यापासून चौकशीच पूर्ण झाली नसल्याच्चे सांगून सैराट अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी माणसे तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच प्रशांत कोल्हे यांनी पत्रकार परिषदेतुन केली आहे
गाव खेड्यातील पांदण रस्त्यासह विकासाची कामे पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायत कडून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात येतात त्यामुळे सण 2016-17 मध्ये चिमूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत ने मानरेंगा अंतर्गत पांदण रस्ते व इतरही विकास कामे केली होती सादर कामाचा रीतसर कृती आराखडा तयार करीत कामाला प्रशासकीय तांत्रिक मान्यता मिळून पंचायत समिती ने कार्यरंब आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायत ने पुरवठादार नेमून साहित्य खरेदी केले व मूल्यकाना नुसार कामे पूर्ण केलीत व पस ला देयके सादर केली मात्र वर्ष संपले तरी पुरवठादार यांची देयके मिळाली नाहीत त्यामुळे चिमूर तालुक्यातील पुरवठादार आर्थिक संकटात सापडले असून कोणतीच अजनशी काम करण्यास तयार होत नाही आहे त्यामुळे तालुक्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत
देयका बाबतीत मुख्य कार्यपालन अधिकारी व संवर्ग विकास अधिकारी यांना विचारणा केली असता सदर कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे प्रशासना पुढे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत ग्रामपंचायत ने पाठविलेल्या नियम बाह्य प्रस्तावास प्रशासकीय, तांत्रिक मान्यता का देण्यात आली व मग मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई का करण्यात आली नाही तसेच कामात भ्रष्ट्राचार झाला तर चौकशी करून अहवाल किती दिवसात सादर करायला हवा,चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समिती मधील अधिकाऱ्याच्या अहवालात एक वाक्यता का नाही व सैराट अहवाल का देण्यात आला त्यामुळे वरिष्ठ अधिकारी तसेच पडगंधिकार्याचे नियंत्रण नासक्याचा आरोप प्रशांत कोल्हे यांनी केला आहे
चिमूर तालुक्यातील एखाद्या कामात अनियमितता झाली असेल म्हणून सर्वच पुरवठादार यांचे देयके का अडवली चिमूर पंचायत समिती मधील मनरेगा योजनेतील चौकशी करीत नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करून देयके तात्काळ देण्यात यावी अन्यथा 01 फेब्रुवारी ला मुख्यकार्यकारी अधिकारी यांना माणसे तर्फे घेराव घालुन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून मनसे तालुका अध्यक्ष प्रशांत कोल्हे यानी दिली यावेळी सरपंच कलावती जुमनाके,अर्चना थुटे, नरेश वलके,अरुण दोडके उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!