रानटी डुकराने केला महिलेला गंभीर जखमी
रानटी डुकराने केला महिलेला गंभीर जखमी
जितेंद्र पेंदाम/पवनपार
चंद्रपुर जिल्ह्यतील सिंदेवाही तालुक्यातील पवना(चक) येथील महीलेवर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर केल्याची घटना आज १२ वाजता दरम्यान घडली.वच्छला गणपत शेन्डे वय (५५) असे महिलेचे नाव आहे.ही घटना गावालगत कम्पारमेन्ट १८३८ मध्ये घडली.
सदर महिला गावाबाहेर आपल्या लहान नातनी सोबत गेली होती.गावालगत झुडपी जंगल आहे.झुडुपातुन रानटी डुकराने त्या महिलेवर तिव्र हल्ला केला,थोडक्यात लहान मुलगी वाचली.घटना गावाबाहेर रस्त्यालगत जाना-या लोकांच्या नजरेत आल्याने लोकानी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली.तोपर्यंत डुकराने महिलेच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत करून निघुन गेला.
गंभीर महिलेला सिंदेवाही येथील रूग्णालयात भरती करण्यात आले. तेथील डॉक्टारांनी प्राथमिक उपचार केले.पुढील उपचाराकरीता चंद्रपुरला हलविले.
दिवसेंदिवस रानटी डुकर गावात येत असल्याने व अशा घटना गावालगत घडत असल्याने गावात भितीचे वातावरन निर्मान झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!