गुंफा यात्रा महोत्सवात चिमूर आगारा च्या महसुलात वाढ

गुंफा यात्रा महोत्सवात चिमूर आगारा च्या महसुलात वाढ

एसटी च्या या कामगिरीवर सर्वच स्तरावरून अभिनंदन

शुभम बारसागडे (नेरी/चिमूर)

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तपोभूमीत ५९ व्या गुंफा यात्रा महोत्सव दरम्यान यात्रेकरूंना तपोभूमीत सोडणाऱ्या ग्रामीण भागातील जीवन वाहिनी एसटी ने प्रसंसनिय कामगिरी करीत चिमूर आगाराच्या महसुलात वाढ केली आहे. यामुळे सर्वच स्तरावरून वाहक चालक आणि आगरप्रमुख व इतर सर्व कर्मचारी वर्गावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गुंफा यात्रा गोंदेडा ला गुरुदेवभक्त भाविकांना नेऊन सोडण्यासाठी व आणण्यासाठी चिमूर आगाराने ६ एसटी बसेस लावल्या होत्या. ह्या बसेस ची दर १५ मिनीटांनी गोंदेडा ते चिमूर फेरी व्हायची. यात एकूण ८२ फेऱ्या झाल्या असून ६९६९३ रुपयाचे उत्पन्न मिळाले तर ३९७६ प्रवाशांनी प्रवास केला. ही बस सेवा सुरू करण्यासाठी पांडुरंग अडसोडे मोटेगाव, यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी चिमूर आगार व्यवस्थापक प्रिंतेंश रामटेके यांनी सहकार्य केले. विशेष नेतृत्व तरोडे, बोबडे तर सहकार्य तिवारी, गायकवाड, झाडे, मात्रे, गेडाम, वाहने, मिलकर भुते, राठोड, बुरडकर यांनी केले. यासाठी चिमूर आगारातील सर्व कर्मचारी पदाधिकारी यांनी मदत केली. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी वर सर्वच स्तरावरून अभिनंदन केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!