अवकाळी पावसाने आणले शेतकऱ्यांचे डोळ्यात पाणी
मूल (अमित राऊत)
हवामान खात्याने काही दिवसाआधी 24 ते 26 तारखेपर्यंत गारपिठीसह वादळी पाऊस पडणार असल्याचे अंदाज दर्शविला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून पोंभुर्णा तालुक्यातील चेक कोसंबी या गावातील वसंतराव पोटे या शेतकऱ्यांचे पिक अवकाळी पाऊस व गारपिठीने लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. 25 तारखेच्या रात्री पोंभुर्णा तालुक्यात गारपिठीसह वादळी पावसाने संपुर्ण जणजिवण विस्कळीत झाले आहे.
एकीकडे संपुर्ण देशात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिनाचे आनंदाश्रु होते तर दुसरीकडे चेक कोसंबी येतील शेतकऱ्याच्या डोळ्यात पिक नुकसानीमुळे दुखाश्रु दिसत होते.
शेतीवरच संसाराचा गाडा हाकणाऱ्या चेक कोसंबी येथिल शेतकरी वसंतराव पोटे उदरनिर्वाकरीता आपल्या शेतात काही एकरात गहु, टमाटर,मिरची,हरभरा(चना), कांदा, वांगी आदी पिकाची लागवड केली होती. मात्र 25 तारखेच्या रात्रीला गारपीठीसह वादळी पाऊस आल्याने संपुर्ण होत्याचे नव्हते झाले. शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली असून या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे. शासनस्तरावरून हवालदिल झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचा पंचनामा करून दखल घेण्यात यावी.
एकीकडे नैसर्गिक आपत्ती तर दुसरीकडे शेतमालाला भाव नाही आणि मोठ्या कष्ठाने लावलेल्या पिकाचेही मातीमोल झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक डोंगर कोसळले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!