बालाजी वार्ड श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे राष्ट्रसंत पुण्यस्मरणार्थ विविध कार्यक्रम संपन्न

बालाजी वार्ड श्रीगुरूदेव सेवा मंडळातर्फे राष्ट्रसंत पुण्यस्मरणार्थ विविध कार्यक्रम संपन्न 

चंद्रपूर (प्रतिनिधी ) - श्रीगुरूदेव सेवा मंडळ बालाजी वार्ड महिला व पुरूष शाखेच्या वतीने राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या पन्नासाव्या  पुण्यस्मरणाच्या निमित्ताने  कार्यक्रमाचे आयोजन बालाजी वार्डात  करण्यात आले होते . घटस्थापना व प्रतिमा पुजन अमोल बुरडकर व सौ . निवेदिता बुरडकर तसेच दिपक गौरकर व सौ.वैशाली गौरकर  यांच्या हस्ते झाले. त्या निमित्ताने सामुदायिक ध्यानपाठ व  प्रार्थना , स्वच्छता अभियान , वार्डात रामधुन ,  महिला व पुरूषांच्या भजनांचे आयोजन करण्यात आले होते . समारोपिय कार्यक्रमात आण्याजी ढवस यांच्या कीर्तन सेवेनंतर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ॲड. दत्ताभाऊ हजारे  होते . सेवामंडळाचे  बंडोपंत बोढेकर , विजय चिताडे ,  रत्नाकर जोगी , नगरसेवक  प्रशांत दानव , सौ.अनुराधा हजारे , सौ. वृंदाताई हुलके ,श्रीमती सुमन  चांदेकर ,  दादाजी नंदनवार , धर्माजी खंगार ,अरूण बुरडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती . सूत्रसंचालन अनिल उपरकर  यांनी केले तर श्रीमती आशा बुरडकर यांनी आभार मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाजी वार्ड  श्रीगुरूदेव महिला भजन मंडळ, बालविर   श्रीगुरूदेव महिला भजन मंडळ ,दुर्गा श्रीगुरूदेव महिला भजन मंडळ , गोपीकृष्ण श्रीगुरूदेव महिला भजन मंडळ ,एकता श्रीगुरूदेव महिला भजन मंडळ , सरस्वती श्रीगुरूदेव महिला भजन मंडळ,तुळजाभवानी  श्रीगुरूदेव  महिला भजन मंडळाच्या सर्व सदस्यांनी तसेच वार्डातील स्रीपुरूषांनी अथक परिश्रम घेतले . या शाखेच्या वतीने बंडोपंत बोढेकर आणि आण्याजी ढवस यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रबोधन कार्यक्रमानंतर  जयघोष आणि महाप्रसादाने सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!