होम स्टे असोसिएशनचा प्लास्टिक मुक्त ताडोबाचा संकल्प
चंद्रपुर (सुलेमान बेग)
आज दिनांक 30/01/2019 रोजी महात्मा गांधी पुण्यतिथि निमित्य होमस्टे असोसिएशन तर्फे स्वच्छता अभियान अंतर्गत मोहिम राबविन्यात आले यात पदमापुर मोहर्ली बफर रोड वरील कालापानी ते नवरगांव चौकी पर्यन्त 6 किलोमीटर रोड वरील प्लास्टिक मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आला. यात चिप्स वेपर, पानी बोल्ट्स, खरा पन्नी व इतर वेग वेगळे वेपर त्यात होते. असे निर्देशनात आले की या रोड वरील जाणारे काही ना समझ पर्यटक गाड़ी खाली पन्नी फेकतात व त्याचा स्वाद चखण्यासाठी वन्यजीव ते खातात व आपले प्राण गमवतात त्यांचे प्राण वाचविण्यासाठी या भागाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सारे प्लास्टिक गोळा करण्यात आला. यावेळी Homestay Association for Sustainable Tourism. & Environment Education (HASTEE) चे अध्यक्ष मोहम्मद नाहिद सिद्दीकी, सचिव मोहम्मद सुलेमान बेग, सह सचिव आशीष पुराणिक, उपाध्यक्ष सोनल आवारी, मुकेश शिवणकर, कोषाध्यक्ष मंगेश लाहमगे, वन विभाग मोहर्ली बफर वनपरिक्षेत्र अधिकारी मून साहेब, वन रक्षक सोयाम, तसेच होमस्टे असोसिएशन के हर्षल तारगे, विनोद सातपुते, होमस्टे कर्मचारी आदि उपस्थित होते. अशा प्रकार चे मोहिम प्रत्येक महिन्यात राबविन्यात येणार असे होमस्टे असोसिएशन चे अध्यक्ष मोहम्मद नाहिद सिद्दीकी यांनी आज सर्व कार्यकर्त्याशी बोलताना सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!