हल्लेखोरांवर कारवाई करा - रोहीत तुराणकरची मागणी
चंद्रपुर (वार्ताहर)
वणी येथील महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजु भाऊ तुराणकर यांचे लहान भाऊ सुरज भाऊ तुराणकर यांच्यावर काल प्राणघातक हल्ला चार ते पाच ईसमांनी केला पोलिसात तक्रार दाखल करण्यातआली असता पोलीस प्रशासन कुठलेही सहकार्य करत नाहीत त्यामुळे उद्या न्यु डेबुजी फोर्स महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष रोहीत भाऊ तुरानकर यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन वणी जावुन पोलीस निरीक्षक यांना विचारणार जाब कार्यवाही करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावीत म्हणून तहसीलदार वणी यांना निवेदन देण्यात येणार आहेत जर पोलीस प्रशासनाकडून योग्य कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन करू आंदोलन करूनही प्रश्न सुटला नाही तर तर अन्याय करणार्यांना धोबीघाट वर नेवुण धुतल्या शिवाय सोडणार नाही असे मत न्यु डेबुजी फोर्स महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष अनुपराजे राजुरकर यांनी व्यक्त केले.
| रोहीत तुराणकर |
धोबी सामाजावर महाराष्ट्रात कुठेही अन्याय झाला तर आम्ही तो सहण करणार नाही या नंतर आमच्या धोबी बांधवांन वर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर महाराष्ट्रातील सर्व न्यु डेबुजी फोर्स महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी त्यांना धोबीपछाड दिल्या शिवाय राहणार नाही असे मत न्यु डेबुजी फोर्स महाराष्ट्र राज्य चे प्रदेश उपाध्यक्ष रोहित तुराणकर यांनी व्यक्त केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!