महिलेची विहीरीत उडी घेवून आत्महत्या
महिलेची विहीरीत उडी घेवून आत्महत्या......
पोंभूर्णा (जवाहर धोडरे) दि. 15
पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार पोलिस स्टेशन हद्दीतील डोंगर हळदी बेघर येथील एका विवाहीतेने घराशेजारील सरकारी विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना काल दि. 14 चे उत्तर रात्रो घडली.मृतक महीलेचे नाव उषा रुषी तंगडवार वय 38 असे असून तीचे मागील आठवड्यापासून मानसिक संतुलन बिघडले होते असे बोलले जात आहे. मृतकाच्या कुटूंबियांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद करुन प्रकरण तपासात घेत मर्ग दाखल केला आहे. उमरी पोतदार पोलिस स्टेशन चे ठाणेदार मसराम यांचे मार्गदर्शनात पुढील तपास चालू असून प्रेत शवविच्छेदनानंतर कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. तिच्या पश्चात पती,1 मुलगा असून पती रामपूर दीक्षित येथे मेंढ्या राखण्याचे काम करतात. आज डोंगर हळदी येथील स्मशानात तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!