ठेकेदाराला फुगविण्यासाठी मजूर उपाशी

ठेकेदाराला फुगविण्यासाठी मजूर उपाशी
सावली :

 तालुक्यातील अंतरगांव येथे ग्राम रोजगार हमी योजनेंतर्गत मागील दोन महिन्यापासून पंचायत समिती कडे काम मागत असतानाही पंचायत समिति ने मजुरांना कुठलेही काम अजूनपर्यंत दिलेले नाही. जानेवारी 2018 मध्ये गावातील काही मजूर व  रामचंद्र हुलके यांनी मिळून रोहयो अंतर्गत काम मिळावे याकरिता पंचायत समितीला अर्ज सादर केला होता व अर्ज भेटण्याच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत काम देने गरजेचे होते मात्र महिना लोटूनही या मजुरांना काम दिले नाही. १ महिन्यानंतर मजुरांनी बेरोजगार भत्ता मिळावा यासाठी अर्ज केला परंतु बीडीओ ने यावर काहीच कारवाई केली नाही मात्र त्याच गावातील रोड वर मुरुम पसरविण्याचे काम परस्पर ठेकेदाराला देऊन ८ मार्च २०१८ रोजी  कामाला सुरुवात झाली. त्या कामावर कामाची मागणी करणाऱ्या मजूरांना काम न देता ग्रामपंचायतीने ठेकेदार पद्धतीने काम केले. 
यामुळे मजूरांनी ग्रामसेवक, सरपंच, व रोजगार सेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!