सिंदेवाही तहसिलवर श्रमिक एल्गार चा धडक माेर्चा

सिंदेवाही (प्रतिनिधी) :-
श्रमिक एल्गारच्या वतीने आज सिंदेवाही तहसिल कार्यालयावर विविध प्रश्नावर माेर्चा काढण्यात आला . माेर्चा शिवाजी चाैक ते तहसिल कार्यालय असा काढण्यात आला. माेर्चाला शेकडाे नागरीक सहभागी झाले हाेते. 
निराधारांना दाेन हजार रुपये अनुदान देण्यात यावा, घरकुलं मंजुर करावे, व थकित असलेले बिल लाभार्थ्यांना देण्यात यावे. सिंदेवाही तालुक्यात राे.ह.याे. अंतर्गत नहराचे काम शुरु करुन सिंचनाची साेय करावी, अनेक गावत बस न जात असल्याने बस सेवा सुरु करावी, अन्नसुरक्षा याेजनेचा लाभ गरीबांना देण्यात यावा, सरडपार ते चिटकी चे राेडचे काम शुरु करावे तसेच चिटकी येथील स्मशान भुमिचे काम तात्काळ शुरु करावे, यासह इत्यादी मागण्या करण्यात आल्या माेर्चाचे नेतृत्व संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांनी केले, माेर्चात श्रमिक एल्गारचे महासचिव घनशाम मेश्राम , पुष्पा नेवारे, रवि नैताम,शशिकांत बतकमवार, गुलाब बाेरुले, यांनी मार्गदर्शन केले यावेळी तहसिलदार रावडे यांनी माेर्चा स्थळी येवुन मागण्यांचे निवेदन स्विकारले व शासनाकडे सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन माेर्चेकरुंना दिले माेर्चा चे यशस्वीतेसाठी वंदना मांदाडे, साैरभ उईके, मिलींद मडावी , प्रकाश सिडाम , अनुसया नैताम , नंदकिशाेर वाकडे , यांनी परीश्रम घेतले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!