दारूबंदीची प्रभावी अमंलजावणी करा – महिला दिना निमीत्त मुख्यमंत्रीना पाठविले निवेदन
दारूबंदीची प्रभावी अमंलजावणी करा – महिला दिना निमीत्त मुख्यमंत्रीना पाठविले निवेदन
चंद्रपूर-वर्धा व गडचिरोली जिल्हयात शासनाने दारूबंदी लागू केली असली तरी, या तीनही जिल्हयात अवैदय दारू सुरू असल्यांने या दारूबंदीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी शासनाने दारूबंदीचे कायदे कडक करावे अशी मागणी आज जिल्हयातील तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून मागणी करण्यात आली आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.
दारूबंदीचे कायदे कडक करा, अतिरिक्त पोलीस द्या, जामीनाचे कायदे कडक करा, अवैदय दारू पुरवठा करणारे वाहन सरकार जमा करा. यासह वेगवेगळया मागण्यांचे निवेदन आज मूल, सावली, पोंभूर्णा, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, वरोरा, गोंडपिपरी, कोरपणा तालुक्यातून देण्यात आलेत. तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ही मागणी करण्यात आली.
मूल तालुक्यात छाया सिडाम, संगीता गेडाम यांचे नेतृत्वात, नागभीड तालुक्यात सपना कामडी यांचे नेतृत्वात तर ब्रम्हपुरी येथे शालू धुर्वेच्या नेतृत्वात महिलांनी हे निवेदन दिले. पोंभूर्णा तालुक्यात छाया जनगनवार यांनी तर राजूरा तालुक्यातील शिष्टमंडळाचे नेतृत्व रेखा टेकाम यांनी केले. कोरपणा तालुक्यात मालन किन्नाके हिचे नेतृत्वात दारूबंदीच्या अमंलबजावणीची मागणी करण्यात आली. वरोरा तालुक्यात मनिषा लोनगाडगे यांचे नेतृत्वात दारूबंदीच्या अमंलबजावणीची मागणी करण्यात आली. सावली तालुक्यात यात्रिका कुमरे हिचे तर सिंदेवाही तालुक्यात वंदना मांदाडे हिचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले. गोंडपिपरी तालुक्यातील महिलांचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या उपाध्यक्षा झाराबाई चांदेकर यांनी केले.
ॲड. पारोमिता गोस्वामी यांचे मार्गदर्शनात हे आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हयात दारूबंदीनंतर दारूबंदीच्या प्रभावी अमंलबजवणीसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियानचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, कडक अमंलबजावणीची यंत्रणा होइपर्यंत हे आंदोलन चालू राहील असे ॲड. पारोमिता गोस्वामी यांनी निवेदनातून म्हटले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!