माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी 'केंद्रात कि राज्यात' याबाबतचा आपला निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी 'केंद्रात कि राज्यात' याबाबतचा आपला निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविला असून, मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपाध्यक्ष अमीत शहा यांचेशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे.  राणे यांनी नेमका कोणता निर्णय घेतला यावर राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
नारायण राणेबाबत दोन दिवसात निर्णय अपेक्षीत असून, त्यानंतरच त्यांची भावी राजकीय भूमिका निश्चित होणार आहे.
कॉंग्रेसवर कठोर टिका करीत नारायण राणे यांनी पक्ष सोडला होता.  भाजपात जावून मंत्री पद घेण्यांचा त्यांचा मानस होता. नामदार चंद्रकांत पाटील यांनीही राणेसाठी मंत्रीपद त्यांग करण्यांची जाहीर भूमिका घेतली होती.  प्रत्यक्षात मात्र राणे कॉंग्रेसबाहेर गेल्यानंतर, शिवसेनेचे कारण भाजपाकडून त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवले. नंतर चंद्रकांत पाटील यांनीही आपले खाते सोडण्यांस नकार दिल्यांचे समजते.
भाजपात प्रवेश देता राणे यांनी स्वत:चा पक्ष काढावा आणि एन.डि.ए.त सहभागी होवून मंत्री व्हावे असा नवा प्रस्ताव भाजपानी दिला.  त्यानुसार राणे यांनी स्वाभीमान या नावांने पक्ष स्थापन केले व एन. डी. ए. चे घटक पक्ष म्हणून सहभागी झाले.  तरीही भाजपाने त्याना मंत्रीपदापासून दूर ठेवल्यांने, राणे अस्वस्थ होत, लवकर मंत्री करा असा आग्रह धरू लागले.
मागील आठवडयांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी समवेत नारायण राणे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेवून चर्चा केली, त्यावेळी अमीत शहा यांनी त्यांना राज्यसभेची आॅफर दिल्यांचे समजते. राज्यसभेची आॅफर वर ट्विट करतांना राणेपुत्र नितीश राणे यांनी, राणे साहेबांची राज्यातच आवश्यकता असल्यांचे सांगीतले होते.  या पाश्व्र्रभूमिवर राणे यांनी नेमका कोणता निर्णय घेतला यावर राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!