आंबेधानाेरा येथील शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई द्या — अँड. पारोमिता गाेस्वामी यांची मागणी

आंबेधानाेरा येथील शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई द्या — अँड. पारोमिता गाेस्वामी यांची मागणी 
मूल (वार्ताहर) :
      आंबेधानाेरा येथील शेतकऱ्यांना अत्यल्प शेतीची नुकसान भरपाई वनविभागाने दिल्याने अँड. पाराेमिता गाेस्वामी यांचे नेतृत्वात शेतकऱ्यांनी मुख्यवनसंरक्षक चंद्रपुर यांचे कार्यालयासमाेर 'धरने आंदोलन' करण्यात आले. आंबेधानाेरा येथिल शेतकऱ्यांची मागील खरीप हंगामात वन्य प्राण्यापासुन प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी वनविभागाकडे अर्ज केला. मात्र वनविभागाने मनमानी करीत नियमानुसार नुकसान भरपाई न देता शेतकऱ्यांची प्रचंड लुट केली. सदर प्रकरण श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अँड. पाराेमिता गाेस्वामी यांनी मागील दाेन महीण्यापासुन उचलुन धरलेला असुन वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याने वनविभागाचे विराेधात मुख्यवनसंरक्षक कार्यालयासमाेर धरणे आंदाेलनाला सुरवात केली.
       अँड पाराेमिता गाेस्वामी यांनी शेतकऱ्यांना न्याय वनविभाग दिला नाही तर आंदाेलन तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला.
       धरणे आंदाेलनाची दखल घेवुन मुख्यवनसंरक्षक मान. शेळके यांनी
शेतकऱ्यांना तफावतीची रक्कम एक महीण्याचे आत देण्याचे आदेश काढले व शिष्ट मंडळाला ग्वाही दिली निवेदनातुन शेतकऱ्यांना नियमानुसार तफावतीची रक्कम देण्यात यावी. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतांना वनविभागाचे अधिकारी मनमानी व घाेटाळा केला असल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात यावी. बाकी असलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी. या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या यामुळे आंबेधानाेरा येथील शेतकऱ्यांना प्रचंड दिलासा मिळाल्याचे मनाेगत शेतकरी व्यक्त केले. धरणे आंदाेलनात श्रमिक एल्गारचे महासचिव घनशाम मेश्राम, महिला महासचिव छाया सिडाम, रवि नैताम, संगिता गेडाम, रमेश हनमलवार, छाया जनगनवार यांनी मार्ग दर्शन केले. तर बिंदु गडलिंग, माेनी कुळमेथे, प्रियंका गावंडे, सुरेश काेवे व आंबेधानाेरा येथील शेतकरी सहभागी झाले हाेते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!