वनपालाचा वनरक्षकावर प्राणघातक हल्ला
वनपालाचा वनरक्षकावर प्राणघातक हल्ला
भाडोत्री गुंडाकरवी जीव मारण्याचा प्रयत्न
घटनेच्या दिवशी पाथरी वनकार्यालयात ओल्या पाटीचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. मुख्य आरोपी भिमचंद देविदास चिकाटे व इतर वनरक्षक आणि कर्मचारी आधीच या ठिकाणी हजर होते. फिर्यादी महादेव कोहळे यांना कर्तव्यावर यायला थोडा विलंब झाल्याने दोघांमध्ये बरीच याचायाची झाली आणि नंतर हे प्रकरण एकमेकांवर हात उगारण्याइतपत आले. आरोपी चिकाटे यांनी कोहाळे यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. जखमी अवस्थेत कोहाळे यांनी पेंढरी बसथांबा गाठला असता आरोपीने आपल्या दोन मुलांना व भाडोत्री मुलांना पाचारण करून कोहाळे यांना आणखी मारहाण केली. ही मारहान सुरू असतांना काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याने या मारहानीत गावक—यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता गावातील दोन ते तीन युवक जखमी झाले. यानंतर हे सुरू असतांना गावची पोलीस पाटील यांनी पाथरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. व 12 आरोपीना पकडण्यात यश आले. या घटनेचे मुख्य सुत्रधार वनपाल चिकाटे अद्याप फरार आहेत. पोलिसांनी चिकाटे यांच्यावर अपराध क्रमांक 38/18 भा.दं.वि. कलम 323, 324, 147, 148, 149 आर.डब्ल्यू. 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाडोत्री गुंडाकरवी जीव मारण्याचा प्रयत्न
सावली (वार्ताहर):
सावली वनपरिक्षेत्रातंर्गत पाथरी बिटातील वनपालाने चारगाव बिटातील वनरक्षक महादेव रघुनाथ कोहाळे यांना क्षुल्लक कारणावरून भाडोत्री गुंडाना घेवून जबर मारहाण केली. गंभीर जखमी महादेव कोहाळे यांना चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना अशी की, पेंढरी मक्ता येथे होळीच्या रात्री 11 वाजताच्या सुमारास वनविभागाच्या दोन कर्मचा—यांमध्ये वाद होवून दोघात मारहान झाली. या मारहानीमुळे संतत्प वनपाल चिकाटे यांनी बाहेरून 17-18 भाडोत्री मुले बोलवून वनरक्षक कोहाडे यांच्यावर हल्ला केला. या घटनेनी वनविभागात खळबळ उडाली आहे.घटनेच्या दिवशी पाथरी वनकार्यालयात ओल्या पाटीचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. मुख्य आरोपी भिमचंद देविदास चिकाटे व इतर वनरक्षक आणि कर्मचारी आधीच या ठिकाणी हजर होते. फिर्यादी महादेव कोहळे यांना कर्तव्यावर यायला थोडा विलंब झाल्याने दोघांमध्ये बरीच याचायाची झाली आणि नंतर हे प्रकरण एकमेकांवर हात उगारण्याइतपत आले. आरोपी चिकाटे यांनी कोहाळे यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. जखमी अवस्थेत कोहाळे यांनी पेंढरी बसथांबा गाठला असता आरोपीने आपल्या दोन मुलांना व भाडोत्री मुलांना पाचारण करून कोहाळे यांना आणखी मारहाण केली. ही मारहान सुरू असतांना काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याने या मारहानीत गावक—यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता गावातील दोन ते तीन युवक जखमी झाले. यानंतर हे सुरू असतांना गावची पोलीस पाटील यांनी पाथरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. व 12 आरोपीना पकडण्यात यश आले. या घटनेचे मुख्य सुत्रधार वनपाल चिकाटे अद्याप फरार आहेत. पोलिसांनी चिकाटे यांच्यावर अपराध क्रमांक 38/18 भा.दं.वि. कलम 323, 324, 147, 148, 149 आर.डब्ल्यू. 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!