दारूबंदीच्या अमंलबजावणीसाठी गावातील युवकांनी महिलांना साथ द्यावी — विजय सिध्दावार



दारूबंदीच्या अमंलबजावणीसाठी गावातील युवकांनी महिलांना साथ द्यावी — विजय सिध्दावार

मूल (प्रतिनिधी) : 
दारूबंदीच्या अमंलबजावणीसाठी गावातील युवकांनी महिलांना साथ द्यावी असे आवाहन श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी केले.  ते टोलेवाही येथे तंटामुक्ती समिती आणि बचत गटाचे वतीने आयोजीत व्यसनमुक्ती कार्यक्रमात बोलत होते.
जिल्हयातील महिलांच्या आंदोलनातून दारूबंदी लागू झाली.  ही दारूबंदी अयशस्वी करण्यासाठी समाजातील विघ्नसंतोषी लोक प्रयत्न करीत आहेत.  हा प्रयत्न हानून पाडावा व यशस्वी दारूबंदी करून, व्यसनमुक्त समाज निर्माण करावा असेही श्री. सिध्दावार यांनी उपस्थितांना आवाहन केले.  महिला या स्वतःसाठी नाही तर घरच्या पुरूष मंडळीच्या काळजीने जीवावर उदार होवून दारूबंदी करीत असल्यांने, आपले कर्तव्य म्हणून या महिलांना साथ देण्यांची गरज असल्यांचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी मूल पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री. शिंदे, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती तुळशीराम कुंभारे, टोलेवाहीचे माजी सरपंच संजय आवळे, कांतापेठ दारूबंदी समितीचे अध्यक्ष राजू वाढई, श्रमिक एल्गारच्या कार्यकर्ता श्रीमती संगीता गेडाम, पोलिस पाटील श्रीमती संगीता चल्लावार, चिरोली ग्राम पंचायतच्या सदस्या सौ. कविता सुरमवार, श्रीमती गद्देकार यांचेसह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी श्री. शिंदे यांनी दारूबंदीसाठी पोलिस प्रशासन महिलांना कायम मदत करेल असे आश्वासन दिले.  श्री. तुळशीराम कुंभारे, राजू वाढई, संगीता गेडाम, कविता सुरमवार आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
सवित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यांत आली.  ग्राम पंचायतीचे सचिव संदीप श्रीगीरवार यांनी प्रास्ताविक केले.  कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कविता निकुरे अध्यक्ष, खैरूनीसा पठान,  निखत बचत गट, मनिषा मोहुर्ले सुविधा बचत गट, वैशाली आदे जान्हवी बचत गट, कविता महाडोळे पुजा बचत गट, सिमा जुमनाके कल्याणी बचत गट, ​शिला येरमलवार गायत्री बचत गट, छाया आवळे सावित्रीबाई फुले बचत गट, विद्या लेनगुरे आरती बचत गट, जिजाबाई सोपनकार शारदा बचत गट, मायाबाई भेंडारे लक्ष्मी बचत गट, लोभिका लेनगुरे आशा वर्कर व सुवर्णा चाटारे अंगणवाडी मदतनिस यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमास मोठया प्रमाणावर गावकरी व महिला उपस्थित होत्या.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!