शेतक—यांच्या विविध प्रश्नावर कोरपना तहसिलवर श्रमिक एल्गारचा धडकला मोर्चा

शेतक—यांच्या विविध प्रश्नावर कोरपना तहसिलवर श्रमिक एल्गारचा धडकला मोर्चा
कोरपना (सुरेश कोवे):
तालुक्यातील तहसिल कार्यालयावर  श्रमिक एल्गारतर्फे  चंद्रपुरच्या झुंजार नेत्या अँड पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चा बस स्थानकावरुन तहसिलकार्यालयावर धडकला.  शासनाला   धारेवर धरत आमदार खासदारांनी सबका विकास सांगुन  स्वतःचे भत्ते व पेंशन वाढविले, मागील दहा वर्षात महागाई वाढली, मात्र निराधारांना सहशे रुपये देवुन महीलांची पिळवणुक सरकार करीत आहे तसेच शेतक—यांना पट्टे मिळु नये यासाठी सरकार जाचक अटी लादत आहे, यामुळे अतिक्रमण धारक पट्यापासुन वंचित आहे, तालुक्यात अनेकांना घरकुल नसल्याने घरकुलापासुन गरीब जनता वंचीत असुन गरीबांना कुळाचे व टिनाच्या घरात राहावे लागत आहे असल्याचे मत यावेळी मोर्चाला संबोधित करतांना अॅड पारोमिता गोस्वामी यांनी म्हणाल्या. तसेच अधिका—यांच्या कामचुकारपणामुळे घरकुलाचे मंजुर अनुदान परत गेले असल्याने अधिका—यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. गैरआदिवासींना वन जमिनीच्या पट्यासाठी तिन पिढीची जाचक अट टाकुन आदिवासी गैरआदिवासी असा भेद करुन जातीवाद करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ही सरकार गरीबांना, वंचितांना न्याय देण्यास अपयशी असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.  मोर्चाचे आयोजन व सभेचे संचालन श्रमिक एल्गारचे महासचिव घनशाम मेश्राम यांनी केले. तर उपाध्यक्ष विजय सिद्धावार, बिरबल गुजर, गुर्लावार, माधव नवले, कवडु किन्नाके यांची भाषणे झाली. मोर्चातुन महसुल व वनजमिनीचे पट्टे देण्यात यावे, राहायला घरकुल देण्यात यावे, निराधारांना दोन हजार रुपये अनुदान देण्यात यावा, वनजमिनीच्या पट्टयासाठी गैरआदिवासींना लावलेली तीन पिढीची अट रद्द करण्यात यावी  या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या. निवेदन तहसिलदार मा. हरीश गाडे यांनी स्वीकारले मोर्चाचे यशस्वीतेसाठी माधव नवले, शाहीद अली खान, श्रिनीवास धुर्वे, राकेश कोडापे, वंदना सोयाम, विशाल नर्मलवार, सुरेश कोवे, इतर कार्यकर्तानी  परीश्रम घेतले व मोर्चाची समाप्ती राष्ट्र गिताने करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!