आंबोली जि. प. शाळेत सरपंचाची गुंडागिरी
आंबोली जि. प. शाळेत सरपंचाची गुंडागिरी
विद्यार्थी व शिक्षकांमध्ये दहशतीचे सावट
शंकरपूर (जगदिश पेंदाम ) :
शंकरपूर पासून 5 कि.मी. अंतरावरील आंबोली येथील सरपंच रविंद्र ठाकरे हे जि. प. शाळेत रोज वारंवार जावून शिक्षक व विद्याथ्र्यांना दमदाटी देतात. व महिला शिक्षकांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत असतात. त्यामुळे शालेय अद्यापनात व्यत्यय येत असून शाळेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरपंचावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षण अधिकारी (प्राथ.) यांचेकडे केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!