अन् अनवानी पायाने आजी निघाली मोर्चाला
निराधारांना रु. 2000 पेंशन आनी5 जबरनजोतधारकांना पट्टे या मांगण्यासाठी मूल येथे निघलेला मोर्चा. त्यावर आमचे युवा सहकारी अमित राऊत यानी लिहलेली कविता.
*अन् अनवानी पायाने आजी निघाली मोर्चाला.....*
अाजीच्या हातात लाकडाची काठी
श्रमिक एल्गारच्या मोर्चाले निघाली पदराला, बांधून प्रश्नाच्या गाठी....
पगार अन् पेन्शन आमदार न् खासदाराले
आमचा शेतकरी मरते शेतात यांले पोसाले...
माझ्या पोराच्या हाताले नाही काम
अन् सरकार म्हणते काही दिवस पुन्हा थांब...
घरी आमच्या रायते खावाचे वांदे
मंत्री मात्र विधानसभेत स्वताच्याच पगारासाठी भांडे...
मोर्चात आजी म्हणाली तहसीलदाराले....
आमचा पगार कव्हा वाढवतेस
घरी नाही आहे खावाले.....
अमित राऊत, मूल


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!