शंकरपूर लाकूड डेपोमध्ये जळावू लाकडे व बांबु नसल्यामुळे ठणठणाट
शंकरपूर लाकूड डेपोमध्ये जळावू लाकडे व बांबु नसल्यामुळे ठणठणाट
शंकरपूर (जगदिश पेंदाम) :
वनविभाग ब्रम्हपुरी परिक्षेत्र चिमूर अंतर्गत येत असलेल्या शंकरपूर लाकूड डेपोमध्ये जळावू लाकडे व बांबु नसल्यामुळे ठणठणाट निर्माण होत आहे.
परिसराती एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या क्रियेला लाकूड व बांबु मिळत नसल्याने लोकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
शंकरपूरात लाकडाच्या डेपोची निर्मिती कित्येक वर्षापुर्वी केली गेली असून त्यामार्फत परिसरात जनतेला जळाऊ लाकडे व आदिवासी बुरड समाजाकरीता बांबु पुरविला जात होता. त्यामुळे जंगलचोरी आळा बसत होता. आता मात्र कित्येेक महिण्यांपासून लाकडे व बांबु डेपोत उपलब्ध होत नसल्यामुळे जंगल चोरीचे प्रमाण वाढत आहेत. बांबुपासून साहित्य बनविणारा बुरड समाज लग्नसराई सुरू झाल्यामुळे सुप, टोपले, परडे, या व्यवसायावर उपजिविका करीत होता. पण व्यवसायासाठी डेपोमध्ये बांबु उपलब्ध नसल्यामुळे व्यवसाय कसा करावा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झालेला आहे. लग्न सराईच्या दिवसात ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी लाकडांचा इंधन म्हणून वापर केला जात असते. डेपोत जलाऊ लाकूड नसल्यामुळे ग्रामीण जनता सर्वस्वी जंगलतोडीकडे वळतांना दिसत आहे.
जंगलातील चोरीवर आळा घालण्यावर वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने लाकूड व बांबु मुबलक पुरवइा करण्याची मागणी गावातील तसेच परिसरातील नागरिक करीत आहे. सरपणासाठी जंगलात गेलेल्या लोकांवर जंगली श्वापदांचे हल्ले होण्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर शंकरपूर डेपोत लाकूड व बांबुचा पुरवठा करावा.
काही दिवसापुर्वी येथील वनपाल डांगे साहेब यांचे हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. यांच्याच अंत्यविधिसाठी लाकडे नसल्याने चिमूर येथील वन डेपोतून लाकडे आणावी लागली.ही मोठी शोकांतीका.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!