५ हजार २ शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्याच शाळेत करण्यात येणार - विनोद तावडे
५ हजार २ शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्याच शाळेत करण्यात येणार - विनोद तावडे
मुंबई दि २: विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान राज्य शासनाला करावयाचे नाही आणि त्यामुळेच दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ५ हजार २ शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केले आहे.
कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील शाळांचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील एकूण शाळांपैकी ५,००२ शाळांमधील मुलांची पटसंख्या ० ते १० या दरम्यान आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्यात येत नसून या शाळांमधील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे जवळच्याच शाळेत कसे समायोजन करण्यात येत आहे. यासंदर्भातील पत्रकार परिषद आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शिक्षण मंत्री यांनी समायोजन करताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे महत्त्वाचे असून शिक्षकांच्या नोकरी किंवा बदलीचा प्रश्न उद्भवत नसल्याचे श्री.तावडे यांनी स्पष्ट केले आहे. आज अशा अनेक शाळा डोंगराळ आणि दुर्गम भागात आहेत जेथे विद्यार्थी संख्या शून्य असली तरी शाळा सुरु ठेवण्यात आल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!