भिसी प्राथमीक आरोग्य केन्द्र बनले अवैध पार्कींग चे ठिकाण
भिसी (पंकज मिश्रा)
भिसी येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात परिसरातील गावांमधून तसेच गावातील अनेक रुग्ण येतात. इथे येणारे रुग्ण साधारणतः स्वताःच्या वाहणाने इथे येतात. परंतु प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या संरक्षण भिंतीच्या आत याच परिसरातील काही व्यवसायीक स्वताःच्या मालकिचे खाजगी तसेच मालवाहक वाहने ठेवतात त्यामुळे इथे येणाऱ्या रूग्णांना आपली वाहने उभी करप्यात अडचन निर्माण होत असुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे।
भिसी गावाची लोकसंख्या 20 हजारावर आहे. भिसी प्राथमिक आरोग्य केन्द्राचे परिसरातील गावांमध्ये ७ (सात) उपकेन्द्र आहेत. परिसरातील 30 ते 35 गावांमधील विविध आजाराने ग्रस्त रुग्ण या ठिकाणी उपचाराकरीता येतात. या ठिकानी सकाळी व सायंकाळी असे दोन वेळा रूग्णांची तपासनी केल्या जाते. तसेच या ठिकाणी अनेक रूग्ण भरती सुध्दा असतात. बाहेरून येणारे रुग्ण तसेच भरती असलेल्या रूग्णांना भेटायला येणारे परिचीतांची संख्या भरपुर प्रमाणात असते,त्यामुळे आरोग्य केन्द्राच्या पटांगणात दुचाकी वाहणांचा खच पडलेला असतो. परंतु या परिसरातील काही रेती, गिट्टी, मुरुम, विटांचा पुरवठा करणारे व्यवसायीक आपले ट्रॅक्टर, ट्रक सारखे जड वाहने आरोग्य केन्द्राच्या पटांगणात ठेवतात. या जड वाहणांमुळे आरोग्य केन्द्रात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाहीकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात प्राथमीक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिध्दार्थ गेडाम यांना विचारना केली असता त्यांनी सांगीतले कि ट्रॅक्टर, ट्रक मालकांना अनेकदा सुचना दिल्या परंतु राजकिय वरदहस्त असलेल्या या व्यवसायीकांनी मुजोरीने आपली वाहने प्राथमीक आरोग्य केन्द्राच्या पटांगणात ठेवतात. यानंतर आपल्या वरिष्ठ अधीकाऱ्यांच्या समार्गदर्शनात या वाहन मालकांवर कायदेशिर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!