शिवाजी विद्यालयात विद्यार्थी दिवसानिमित्ताने सामुदायीक प्रार्थनेचे आयोजन
राजूला (वार्ताहर)
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा संचालित श्री शिवाजी विद्यालय राजुरा येथे दि.७ नोव्हेंबर ला ऐतिहासिक विद्यार्थी दिनाचे निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. सामुदायिक प्रार्थणेची सुरुवात संचालक मंडळाचे पुढाकाराने अॅड. राजेंद्र जेनेकर तालुकासेवाधिकारी, देवराव निब्रड मुख्याध्यापक यांनी पुष्पहार अर्पण करुन केली. त्यावेळी लटारु मत्ते मुअ, निरंजने सर, मोहनदास मेश्राम, प्रा. राजेंद्र मालेकर, बळीराम बोबडे, प्रल्हाद उईके, मधुकर भगत, श्रीहरी ठमके, रत्नाकर नक्कावार, रामदास चौधरी, रमेश आडे सर याचेसह शिक्षकवृंदाची व अंदाजे १०० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
सामुदायीक प्रार्थनेचे महत्वावर लटारु मत्ते सर यांनी मार्गदर्शन केले, तर मोहनदास मेश्राम यांनी समयोचित विचार व्यक्त केले. सामुदायिक प्रार्थना विद्यालयात दररोज होणार आहे. सामुदायीक प्रार्थनेला श्री गुरुदेव सेवा मंडळ राजुरा तालुक्यातील प्रचारक मंडळींची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!