शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेवुन काेठारी वनपरीक्षेत्र कार्यालयावर माेर्चा
*शेतकऱ्यांच्या मागण्या घेवुन श्रमिक एल्गारचा काेठारी वनपरिक्षेत्र कार्यालयावर माेर्चा*
आज दि २३/११/२०१७ ला बल्लारशहा तालुक्यातील काेठारी येथिल वनपरिक्षेत्र कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अँड. पाराेमिता गाेस्वामी यांचे नेतृत्वात माेर्चा काढण्यात आला.
माेर्चा सरकारी दवाखाना ते वनपरीक्षेत्र कार्यालय असा काढण्यात आला. माेर्चा वनपरीक्षेत्र कार्यालयावर धडकला संघटनेचे उपाध्यक्ष मा. विजय सिद्धावार यांनी वनविभागाला शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी धारेवर धरत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व वनविभाग रानटी डुक्कराचा बंदाेबस्त करण्यास असमर्थ असुन शेतकऱ्यांनी बंदाेबस्त करनार हे ठनकावुन सांगीतले. संघटनेचे महासचिव घनशाम मेश्राम यांनी वनविभाग गँस च्या नावावर सरपनासाठी लाकुड आनण्यास मज्जाव करत असुन हा महीलांवर अन्याय आहे हे आपल्या भाषनातु सांगितले, तसेच शेतकरी भिवराबाई आत्राम, दयानंद मेश्राम, नारायन मेश्राम यांची भाषने झाली. शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान रानटी डुकरामुळे हाेत आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मात्र अत्यल्प मिळत आहे. शेतकऱ्यांना एकरी विस हजार रुपये नुकसान भरपाई वनविभागाने द्यावी हे भाषनातुन सांगितले. वनपरीक्षेत्र अधिकरी श्री बाबा गाेरख हाके साहेब यांनी निवेदन स्विकरले व निवेदनातील शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवुन पाठपुरावा करण्यात येईल अशी माेर्चे कऱ्यांना ग्वाही दिली.
निवेदनात प्रमुख्याने . रानटी डुक्कराचा बंदाेबस्त करण्यात यावा. शेतकऱ्यांना झालेल्या शेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतीला विनामुल्य साैर कुंपन देण्यात यावे. ग्रामपंचायत स्तरावर सरपनासाठी जळावु लाकुड उपलब्ध करावे , बाेरगाव येथील बांबुकारागिरांना हिरवा बांबु उपलब्ध करावा या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या. माेर्चात लाठी, कन्हाळगाव, कवडजई , बाेरगाव, पारडी, पळसगाव, काेठारी येथिल शेतकरी सहभागी झाले हाेते.
सभेचे संचालन संघटनेच्या महासचिव छाया सिडाम यांनी केले तर मार्चाचे यशस्वीतेसाठी नितेश बावने, लख्खन काेडापे, मयुरी गेडाम, साईनाथ काेडापे, शितल मेश्राम, अंकीता टेकाम, यांनी परीश्रम घेतले. माेर्चा राष्टगिताने समाप्त करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!