शेतकऱ्यांच्या मागण्या घेवुन श्रमिक एल्गारचा जिवती वनपरिक्षेत्र कार्यालयावर माेर्चा- रानटी डुक्करामुळे हाेत असलेली नुकसान थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ साैरकुंपन देण्यात यावे. अँड. पाराेमिता गाेस्वामी यांची माेर्चातुन शासनाकडे मागणी.

       जिवती येथिल वनपरिक्षेत्र कार्यालयावर आज श्रमिक एल्गारच्या वतीने माेर्चा काढण्यात आला.  
माेर्चाचे नेतृत्व अॅड. पाराेमिता गाेस्वामी यांनी केले.
        माेर्चाला मार्गदर्शन करतांना अँड. पाराेमिता गाेस्वामी यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न शासनमान्य असुन शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान संघटना खपवुन घेणार नाही. जिवती तालुक्यात रानटी डुकरे नसल्याची खाेटी माहीती फाॅरेस्टचे  अधिकारी सांगतात मात्र प्रत्यक्षात रानटी डुकरामुळे पिकाची प्रचंड नुकसान हाेत असल्याने सरकार गंभीरतेने विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या समजुन घ्यावे, तसेच सरपनासाठी महीला काड्या अाणतात त्यांचे कडुन फाॅरेस्ट अधिकारी वसुली करत असल्याची धक्कादायक माहीती समाेर अाणून सरकारची तिजाेरी खाली झाल्याने मंत्री अधिकाऱ्यांना सुट दिल्याची टिकाही सरकारवर त्यांनी आपल्या भाषणातून केली. 
     माेर्चा तहसिल कार्यालय ते वनपरीक्षेत्र कार्यालय असा काढण्यात आला. माेर्चा वनपरीक्षेत्र कार्यालयावर धडकताच संघटनेचे महासचिव घनशाम मेश्राम यांनी भाषणातुन शेतकऱ्याच्या मागण्यांवर प्रकाश टाकले. यावेळी तालुका अध्यक्ष जालीम काेडापे, विमल काेडापे, माराेती सिडाम, गाैरुबाई काेटनाके यांची भाषणे झाली. वनपरीक्षेत्र अधिकरी श्री. आडकिने साहेब यांनी निवेदन स्विकारले व निवेदनातील शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवुन पाठपुरावा करण्यात येईल अशी माेर्चेकरुना ग्वाही दिली.
     निवेदनात प्रमुख्याने, रानटी डुक्कराचा बंदाेबस्त करण्यात यावा, शेतकऱ्यांना झालेल्या शेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतीला विनामुल्य साैर कुंपन देण्यात यावे, ग्रामपंचायत स्तरावर सरपनासाठी जळावु लाकुड उपलब्ध करावे, वनविभागाने गॅस वाटपच्या नावावर गावकऱ्यांकडुन वर्गनी जमा केली असुन तात्काळ गॅस देण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. मोर्चात गुडशेला, नागापुर , धाेंडाअर्जुनी, दमपुर माेहदा, शेडवाही , गडपांढरवानी , कलईगुडा, खडकी रायपुर, पल्लेझरी, आसापुर, लिंगणडाेह, नंदप्पा , पांडरवाणी, भुरीयेसापुर, लांबाेरी , येल्लापुर , येरमियेसापुर, काकबन, जिवती येथिल शेकडाे शेतकरी सहभागी झाले हाेते.
      संचालन महासचिव छाया सिडाम यांनी केले तर मोर्चाचे यशस्वीतेसाठी सुरेश काेवे, पाेचु सिडाम, यशवंत रायसिडाम, परशुराम वेलादी , व ईतर कार्यकर्ते परीश्रम घेतले राष्ट्रगीताने माेर्चा समाप्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!