सिंदेवाहीत गुरांना अज्ञात रोगाची साथ?
सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील ५ कि.मि. असलेले
डोंगरगाव (सालोटकर) येथील संदिप श्रावन मेश्राम व सखाराम शेंडे यांच्या म्हैस जंगलात चराई गेल्या असता घरवापसीच्या वाटेवर एक म्हैस ग़ावा बाहेर तर एक म्हैस गावात आल्यावर मरण पावली व इतर जनावरे आजारी असल्याचे पशुपालकांच्या निदर्शनात आल्यावर गावातील पशुपालकात या बाबत हाहाकार माजला आहे. याघटनेची माहीती मिळताच पशुधन पर्यवेक्षक व्हि. बी. गेडाम गावात येवून जनावरांची तपासणी केली.
मृत जनावरा बाबत त्यांनी विषबाधा झाला असल्याचे सांगीतले व अन्य जनावरावर त्यांनी उपचार करून जनावराची तब्बेत आटोक्यात आणली सबंधित घटनेची माहिती मिळताच युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख मिथुन मेश्राम, तालुका प्रमुख पंकज नन्नेवार, शिवशेनेचे तालुका प्रमुख आशिष चिंतलवार यांनी घटना स्थळी भेट देवून पशुपालकासोबत चर्चा केली.
त्यावेळी एका डॉक्टरच्या भरोश्यावर जनावर उपचार करण्यात येत होते. त्यामुळे शासकिय यंत्रनेविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. बुधवारला पशुधन विकास अधिकारी (विस्तार) अतुल ढोक यांनी पाहणी केली व सबंधित घटनेच्या विषबाधेबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. म्हशी मृत पावलेल्या पशुपालकावर संकट ओळवल्याने मदतीची आस धरले आहे व नुकसान भरपाईची मागणी होत आहें


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!