*बस मध्येच प्रवाश्याचा मृत्यू*


शंकरपुर (जगदिश पेंदाम)
कांपा येथील एका प्रवाश्याचा धावत्या बसमध्येच झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान झाली.
चिमूर वरून कांपाकडे जाणाऱ्या बसमध्ये विलास पंचम बांबोळे वय ४० वर्षे हा आपल्या स्वगावी जात होता, त्यावेळी त्याच्या पोटात दुखायला लागले व त्या पोटदुखीमुळे त्याचा बसमध्येच मृत्यू झाला. त्यानंतर बस सरळ शंकरपुर येथील प्रा. स्वा. केंद्रात आणली व प्रवाश्यांना खाली उतरवून व विलास याना डॉक्टरांना दाखविण्यात आले.परंतु विलास हा बसमध्येच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृतक हा मूळचा खांबाळा(नेरी)येथील असून मागील १० वर्ष्यापासून कांपा येथे सासऱ्याकडे राहत होता. त्याच्या मागे पत्नी,३ मुली असा परिवार असून विलासच्या आकस्मित मृत्यूने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे व त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी आता वृद्ध सासरच्या वर आली आहे,घरची परिस्थिती हलाखीची आहे.
त.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!