भिसी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्याचा मनमानी कारभार - बसपा जिल्हा महासचिव यशवंत भोयर यांचा आरोप
भिसी प्रतिनिधी:- पंकज मिश्रा
तालुक्यातील भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सिद्धार्थ गेडाम यांचे असभ्य वर्तन व हुकूमशाहीला परिसरातील जनता कंटाळली असून त्यांचेवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी भिसी येथील बसपाचे जिल्हा महासचिव यशवंत भोयर यांनी केली आहे
काही दिवसांपूर्वी भोयर हे आपले परिवारासह आरोग्य तपासणीसाठी प्रा आ केंद्र भिसी येथे गेले असता त्यांचे सोबत डॉ सिद्धार्थ गेडाम यांनी असभ्य भाषेचा वापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे त्याच दिवशी परिसरातील चिचोली येथील काही महिला रुग्ण व भिसी येथील वयस्क रुग्ण हे सकाळी११वा दरम्यान उपचारासाठी गेले असता ओ पी डी कार्ड देने बंद केले, याबाबत संबंधितांना विचारले असता डॉ गेडाम यांचे आदेशानुसार कार्ड देने बंद केले असल्याचे सांगण्यात आले, याबाबत भोयर यांनी डॉ गेडाम यांची भेट घेऊन विचारणा केली असता सर्व रुग्णासमक्ष अश्लील शब्दात शिवीगाळ करून दारू पिऊन असल्याचा खोटा आरोप लावून पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले हा आपला अपमान असल्याचे मत यशवंत भोयर यांनी व्यक्त केले
भोयर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार डॉ गेडाम हे भिसी येथे रुजू झाले तेव्हा पासून अनेक रुग्णांना खाजगी मेडिकल येथील औषध लिहून देतात, यात डॉ गेडाम यांचे कमिशन असल्याचा आरोप करण्यात आला आहे डॉ गेडाम यांनी आपले स्वताचे घरी खाजगी दवाखाना सुरू केला असून लहानसान आजारकरिता रुग्णांना उमरेड, नागपूर व इतर शहरात आपले जवळचे संबंध असलेल्या डॉक्टर कडे पाठवून त्यांचे कडून कमिशन घेत असल्याचा आरोप भोयर यांनी केला आहे
डॉ सिद्धार्थ गेडाम यांना काही राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वाद असल्यामुळे ते नेहमीच सामान्य नागरिकांसोबत असभ्य भाषेचा वापर करून अपमानित करीत असल्यामुळे त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टी चे चंद्रपूर जिल्हा महासचिव यशवंत भोयर यांनी केली आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!