नगर परीषदेने केली जिओ कपंनी विरोधात पोलीसांत तक्रारप्रभाग क्रमांक -५ मधील अनाधिकृत खोदकाम

भिसी प्रतीनीधी:- पंकज मिश्रा
       चिमूर नगर परीषद क्षेत्रात रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमीटेड कंपनीचे ऑप्टीकल केबल पसरविण्याचे काम रचणा इंटरप्रायजेस नागपुर द्वारा करण्यात येत आहे . प्रभाग क्रमांक ५ मधील मानीक नगर येथे नगर परिषदेस कोणतीही पुर्वसुचणा न देता हजारे पेट्रोल पंप पुढील मेन रोड ते टॉवर पर्यंत अनाधिकृत खोदकाम केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशीक व नगर रचणा अधीनियम १९६६ चे कलम ५२ अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंदविण्या करीता नगर परीषदेने  जिओ कंपनी विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे.
   डिजीटल इंडीया अंतर्गत अनेक कंपन्या आपल्या नेटवर्कचे जाळे सर्वदुर पसरवित आहेत . चिमूर नगर परीषद क्षेत्रात सुद्धा रिलायन्स जिओ इनफोकॉम लिमीटेड , चे केबल पसरविण्याचे काम नागपुर येथील रचणा इंटरप्रायजेस द्वारे सुरु आहे . मात्र ह्या कंपन्या पुर्ण नगर परीषद क्षेत्रात केबल करीता खोदकाम करण्या करीता परवाणगी घेत नाही . यामुळे नगर परीषदेच्या अधिकारांचे हनन होत असते .कंपनी तर्फे हजारे पेट्रोल पंप पुढील प्रभाग क्रमांक .५ मधील मानीक नगराच्या मेन रोडपासुन तर टॉवर पर्यंत खोदकाम करीत असल्याचे काँग्रेस गटनेता नगरसेवक कदीर शेख व विनोद ढाकुणकर यांच्या निदर्शणात आले.
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!