*सावली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर श्रमिक एल्गारचा धडक मोर्चा*

सावली (विशाल नर्मलवार)
रानटी डुकरांचा बंदोबस्त   करा नाहीतर शेतकऱ्यांना डुक्कर मारण्याची परवानगी द्या. अन्यथा शेतकऱ्यांनी डुक्कर मारल्यास  गुन्हे शेतकऱ्यांवर लावू नका असे श्रमिक एल्गारच्या उपाध्यक्ष विजयभाऊ सिद्धावार येथे मोर्चाला  संबोधीत करताना म्हटले.
आज सावली येथे जंगलालगत शेतकऱ्यांना रानटी डुकरापासून होनारी नुकसान भरपाई द्यावी सरपणासाठी  लाकूड उपलब्ध करुन द्यावे, रानटी डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा, बांबू कारागीरांना हिरवा बांबू उपलब्ध करून देण्यात यावा, शेतकर्‍यांच्या विनामूल्य सौरकुंपन देण्यात यावे. या मागण्यांसाठी शेकडोच्या  संखेने सावली तालुक्यातील जंगलालगतचे शेतकरी या मोर्चात उपस्थीत होते .हा मोर्चा जोतिबा फुले चौक ते वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयापर्यंत निघाला होता. संघटेचे उपाध्यक्ष विजयभाऊ सिध्दावार यानी शेतकऱ्यांनाच्या प्रश्नाला वाचा फोडली व शेतकऱ्यांची भयान परीस्थीती अधीकाऱ्यांपूढे मांडली . व वन परीक्षेत्र अधिकारी  जि. व्ही.धाडे यांना यावेळी निवेदन देण्यात आले . वन परीक्षेत्र अधिकारी यानी यावेळी मागण्यांवर सखोल चर्चा करीत सर्व मागण्या मान्य केल्या व याबाबत वरीष्ठाना कळवीनार असल्याचे सांगीतले . यावेळी तालुका अध्यक्ष रामचंद्र हुलके माजी महासचीव व केंद्रीय कमिटी सदस्य विजयभाऊ कोरेवार महासचिव घनश्याम मेश्राम कार्यकर्ती यात्रिका कुमरे यांचे भाषण झाले या मोर्चाच्या यशस्वीते करीता तालुका सचिव अनिल मडावी महासचिव छाया सिडाम अमर कड्याम फरजाना शेख विशाल नर्मलवार रेश्मा गेडाम व तालुक्यातील कार्यकर्ते यानी परीश्रम घेतले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!